नाशिक - महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब धनंजय मुंडे व तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी न्यायालयात गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तत्काळ पोलिसांनी याबाबत सत्य बाहेर आणण्यासाठी सखोल चौकशी करावी त्यानंतर आम्ही आमची मागणी करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेना आणी काँग्रेस यांची मिली जुली कुस्ती
कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असून सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती याबाबत योग्य निर्णय घेईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. औरंगाबाद नामांतर हे डुप्लिकेट काम असून शिवसेना आणी काँग्रेस यांची मिली जुली कुस्ती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजून अनेक जण भाजपच्या वाटेवर आहे.
जे भाजपमधून दुसऱ्या पक्षात गेले ते वाईट आहेत असे मी म्हणणार नाही. अजूनही काहीजण भाजपात येण्याच्या वाटेवर आहेत. 2014 ला ते नसताना सत्ता आलीच की, निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्षात पक्षविस्तार होत असतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा - बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक महापालिकेकडून उपाय योजना
हेही वाचा - मकर संक्रांत निमित्त हलव्याच्या दागिन्यांनी नाशिकची बाजारपेठ सजली