नाशिक - राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढत असून तापमानाचा पारा चाळीसीपार गेला आहे. पाण्याची वाढती मागणी व वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे धरणांतील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.जिल्ह्यातीला २४ धरणांत आजमितीला अवघा ३८ टक्के जलसाठा शिल्लक असून दोन धरणे कोरडी पडली आहेत. पावसाचा लहरीपणा पाहता आणखी एक महिना उपलब्ध जलसाठ्यावर जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे.
मान्सूनचे उशीराने आगमन झाल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होईल - जुनचा पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होईल असे शुभ वर्तमान वेध शाळेने वर्तवले आहे. समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत धरणातील उपलब्ध जलसाठ्यावर एक ते दीड महिना जिल्ह्याची तहान भागवावी लागणार आहे. जिल्ह्यातील २४ धरणांत गतवर्षी ३४ टक्के जलसाठा होता. यंदा परिस्थिती काहिशी समाधानकारक असून चार टक्के जादा म्हणजे ३८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी उशीरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे लबालब भरली होती. त्यामुळे एप्रिल अखेर पर्यंत जिल्ह्यात फारशी पाणी टंचाई जाणवली नाही. पण मे महिन्यात सुर्य आग ओकत असून पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवु लागले होते. ग्रामीण भागात गाव, वाड्या व वस्त्यांवर पाण्यअभावी घसा कोरडा होत आहे. जिल्ह्यातील अनेक धरणांतुन पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहेत. त्यामुळे जलसाठ्यात मोठी घट पहायला मिळत आहे. चिंतेची बाब म्हणजे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्या गंगापूर धरणात गतवर्षी पेक्षा चार टक्के कमी ४५ टक्के जलसाठा उरला आहे. मान्सूनचे उशीराने आगमन झाल्यास भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. ते पाहता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजनाची कसरत जिल्हा प्रशासनाला करावी लागणार आहे....
गंगापूर - ४५
कश्यपी - २८
गौ.गोदावरी - ४३
आळंदी - ३०
पालखेड - २१
करंजवण - २७
वाघाड - १४
ओझरखेड - ३२
पुणेगाव - १८
तिसगाव - १३
दारणा - ४८
भावली -२६
मुकणे - ४३
वालदेवी - ३८
कडवा - २३
ना.मध्यमेश्वर - १००
भोजापूर - २८
चणकापूर - ४३
हरणबारी - ४९
केळझर - २७
नागासाक्या - ०
गिरणा - ४१
पुनद - ०
माणिकपुंज -१५
महाराष्ट्रातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई - राज्यात प्रचंड उष्णता वाढली आहे.धरणातील पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे.तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे.पाऊस लांबला तर आणखी अडचण होईल महाराष्ट्रातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे म्हणून क्लेकटरचे अधिकार प्रांताला दिलेले आहेत.पिण्याच्या पाण्याची त्वरित सोया झाली पाहिजे असे आदेश दिले आहेत.