ETV Bharat / state

अंत पाहू नका..! अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, कांदा उत्पादकांचा इशारा - नांदगांव

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत घसरत आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज क्विंटल मागे सरासरी १ हजार २५ तर जास्तीत जास्त १ हजार ४४ रुपयांची घसरण झाली. याविरोधात आज बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल', असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

farmers
केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी
author img

By

Published : Jan 27, 2020, 3:45 PM IST

Updated : Jan 27, 2020, 4:45 PM IST

नाशिक - नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दर कोसळल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी करण्यात आली.

कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त

हेही वाचा - 'आमच्या हक्काचं पाणी द्या'; मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत घसरत आहेत. शुक्रवारच्या तुलनेत आज क्विंटल मागे सरासरी १ हजार २५ तर जास्तीत जास्त १ हजार ४४ रुपयांची घसरण झाली. याविरोधात आज बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल', असा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

हेही वाचा - VIDEO : दुचाकी वेगाने धावत नसल्याने तरुणाने दिली पेटवून

गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी ३ हजार ५२५ तर जास्तीत जास्त ३ हजार ८१५ रुपये इतका दर मिळाला होता. त्यात घसरण होऊन आज सरासरी २ हजार ५०० रुपये तर जास्तीत जास्त २ हजार ७७१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

Intro:ब्रेकिंग:
मनमाड:नांदगांव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यात कांद्याच्या भावत मोठी घसरण झाल्याने कांद्याचे भाव कोसळल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड बाजार समितीत घोषणाबाजी करून निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली आहे आज संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात एकत्र येऊन केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निर्यातबंदी उठवण्याची मागणी केलीBody:गेल्या काही दिवसा पासून कांद्याच्या भावात होत असलेली घसरण आजही पहावयास मिळाली.नांदगांव,मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात आज कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले असून शुक्रवारच्या तुलनेत आज क्विंटल मागे सरासरी भावात 1025 तर जास्तीतजास्त भावात 1044 रुपयांची घसरण झाल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले व त्यांनी मनमाड बाजार समितीत जोरदार घोषणाबाजी करत निर्यात बंदी खुली करण्याची मागणी केली.यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र शासनाचा तीव्र विरोध करत शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.Conclusion:-गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी 3525 रुपये तर जास्तीतजास्त 3815 रुपये इतका भाव मिळाला होता त्यात घसरण होऊन आज सरासरी 2500 रुपये तर जास्तीतजास्त 2771 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला गेल्या काही दिवसा पासून कांद्याच्या भावात रोज घसरण होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली

बाईट-जगन्नाथ सदगीर,शेतकरी
बाईट शेतकरी 2
बाईट-सुमतीलाल चोपडा हिंदी आणि मराठी व्यापारी,मनमाड
बाईट-बंटी चोपडा व्यापरी

आमिन शेख, मनमाड
Last Updated : Jan 27, 2020, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.