नाशिक - आगामी काळात सर्वसामान्य जनतेला कांदा चांगलेच रडवणार असल्याचे चित्र आहे. सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे आणि यापुढेही तो कायमच राहील, अशी एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या नंतर येणारा कांदा पूर्णपणे खराब झाला आहे. जो आहे तो जेमतेमच त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल पण शेतकऱ्यांकडेच कांदा शिल्लक नसल्याने दोन्ही बाजूने बळीराजाचेच मरण आहे.
हेही वाचा - नाशिकच्या गंगापूर डॅम परिसरात प्रेमीयुगुलांना लुटणारी टोळी जेरबंद...
अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे कांदे खराब झाले होते. त्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे भाववाढ झाली होती. ही भाववाढ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदी केली. मात्र, शेतकऱ्यांनी जास्त कांदे साठवून ठेवलेले नसल्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. तर दिवाळीनंतर नवीन कांदा बाजारात येणार होता. मात्र, यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याची लागवड उशिरा झाली. तर कांद्याला अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे नवीन कांदा कधी बाजारात येण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा - अवकाळीचा फटका; दिंडोरीत हतबल शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
राजस्थान, गुजरातमधीलही साठा संपला -
देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात साठवून ठेवलेला कांद्याचा साठा संपत आला आहे. याशिवाय ज्या-ज्या राज्यात कांदा पिकवला जातो. त्या राज्यात देखील अतिवृष्टीमुळे कांद्याला फटका बसला आहे. त्यामुळे कांद्याचे रोप देखील जळून गेले आहे. तसेच नवीन कांदा बाजरात येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याचीही शक्यता कमी आहे. परिणामी कांद्याला चांगला भाव मिळेल पण सर्वसामान्य जनतेला कांदा चांगलाच रडवणार असे दिसत आहे.