ETV Bharat / state

Onion Conference Rui Nashik : 5 जून रोजी रुईत रयत क्रांतीची 'कांदा परिषद' - निफाडमध्ये कांदा परिषद

निफाड तालुक्यातील रुई या गावातच पहिली कांदा परिषद ( Rayat Kranti Sanghatana Onion Council Rui Nashik ) घेतली होती. त्यामुळे रुई गावात पुन्हा रयत क्रांती संघटने तब्बल ३९ वर्षानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद घेणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी दीपक पगार यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कांदा परिषद
कांदा परिषद
author img

By

Published : Jun 2, 2022, 4:49 PM IST

Updated : Jun 2, 2022, 5:03 PM IST

नाशिक - रयत क्रांती संघटनेकडून रविवारी ( 5 जून ) निफाड तालुक्यातील रुई गावात कांदा परिषद होणार आहे. शरद जोशी यांनी १९८२ साली निफाड तालुक्यातील रुई या गावातच पहिली कांदा परिषद ( Rayat Kranti Sanghatana Onion Council Rui Nashik ) घेतली होती. त्यामुळे रुई गावात पुन्हा रयत क्रांती संघटने तब्बल ३९ वर्षानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद घेणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी दीपक पगार यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना रयत क्रांतीचे पदाधिकारी

'कांद्याला अनुदान मिळावा' : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. कांद्याला अनुदान मिळावा, हमीभाव मिळावा, नाफेडकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा, या प्रमुख मागण्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपा नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमैया ,गोपीचंद पडळकर या परिषदेला हजर राहणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हा हवालदिल झाला आहे. गुजरात राज्याने शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये कांद्याला अनुदान दिले त्याप्रमाणे महाराष्ट्र दिले पाहिजे, अशी मागणीही दीपक पगार यांनी केली आहे.

हेही वाचा - Vegetables: पालेभाज्यांचे दरही कडाडले; आवक कमी झाल्याचा झाला परिणाम

Last Updated : Jun 2, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.