नाशिक - शहरातील शिवाजी स्टेडियम येथे ड्रेनेज साफ करताना एका सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आणखी ३ सफाई कामगार चेंबरमध्ये अडकले असून बचावकार्य सुरू आहे. मागील ८ दिवसातील ही दुसरी घटना आहे.
शिवाजी स्टेडियम येथे ड्रेनेजच्या सफाईचे काम सुरू होते. यावेळी चेंबरमध्ये गुदमरून एका कामगाराचा मृत्यू झाला. आणखी ३ कामगार चेंबरमध्ये अडकले आहेत. घटनास्थळी अग्निशामक दल पोहचले असून बचावकार्य सुरू आहे. सफाई कामगारांना अपुरी साधने दिल्याने कर्माचाऱ्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी सफाई कामगारांचे पाय धुतले होते. मात्र, त्यांना कामगाराचे दुःख कळत नसल्याची टीकाही मोदींवर होत आहे.