ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात बुधवारी 117 कोरोनाबाधित रुग्ण वाढले; 7 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 18, 2020, 11:25 AM IST

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 2274 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब म्हणजे यातील 1413 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

Nashik corona update
नाशिक कोरोना अपडेट

नाशिक- शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे. उपचार घेत असलेल्या 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नाशिक शहरात सर्वाधिक 54 रुग्ण आढळून आले असून जायखेड्यात 21 तर येवल्यात 17 रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 142 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगावानतंर नाशिक हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून शहरात रोज 50 ते 60 कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारपर्यंत नाशिक शहरात 861 जणांना कोरोनाची लागण झाली असून 339 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 446 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 2274 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब म्हणजे यातील 1413 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. 1085 रुग्णांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिक शहरासोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून जिल्हा आरोग्य विभागाने या भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू 142

नाशिक ग्रामीण 20

नाशिक मनपा 46

मालेगाव मनपा 66

जिल्हा बाह्य 9

एकूण 142

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.