नाशिक- जिल्ह्यात मंगळवारी 185 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 174 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील असून 11 नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. दिवसभरात 8 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून आतापर्यंत एकूण जिल्ह्यात 349 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून आता पर्यंत 7 हजार 444 जणांना कोरोनाची लागण झाली.त्यापैकी 349 जणांचा बळी गेला आहे.दिलासादायक बाब म्हणजे 4 हजार 966 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
सध्या नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 3 हजार 634 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे.
एकाच दिवशी 658 संशयित रुग्ण दाखल
नाशिक जिल्ह्यात 14 जुलै रोजी एकाच दिवशी 658 रुग्ण दाखल झाले आहेत.त्यातील रुग्णांना नाशिक जिल्हा रुग्णालय 15, मेडिकल कॉलेज 9, नाशिक महानगरपालिका हॉस्पिटल 336, मालेगाव रुग्णालय 15, ग्रामीण रुग्णालय डीसीएचसी मध्ये 257 आणि समाजकल्याण कोविड सेंटरमध्ये 26 जणांना ठेवण्यात आले आहे.
मागील 24 तासात मिळून आलेले रुग्ण.
नाशिक ग्रामीण 11
नाशिक मनपा 174
मालेगाव मनपा 00
एकूण मृतांची संख्या- 349
नाशिक ग्रामीण 75
नाशिक मनपा 181
मालेगाव मनपा 79
जिल्हा बाह्य 14