ETV Bharat / state

Nashik Crime: धक्कादायक! एक दिवसाच्या नकोशीला फेकले रस्त्याच्या बाजूला; कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृत्यू - पोलिसांना याची माहिती

Nashik Crime: कडाक्याच्या थंडीत जन्मदात्यांच्या भावना गोठल्याचे चित्र नाशिकच्या चुंचाळे भागात बघायला मिळाले आहे. एक दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला घेऊन काही तासच झालेल्या पोटच्याची मुलीला पिशवीत कोंबून तिला रस्त्यावर कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime
Nashik Crime
author img

By

Published : Nov 30, 2022, 10:52 AM IST

नाशिक: कडाक्याच्या थंडीत जन्मदात्यांच्या भावना गोठल्याचे चित्र नाशिकच्या चुंचाळे भागात बघायला मिळालं. एक दिवसाची बालिका नकोशी झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला घेऊन काही तासच झालेल्या पोटच्याची मुलीला पिशवीत कोंबून तिला रस्त्यावर कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले. थंडीत कुडकुडत टाहो फोडत असताना देखील माता- पित्यांना भावनेचा पाझर फुटला नाही. तिला बेवारस टाकत निगदपणे निघून गेले. काही वेळातच या चिमुकलीचे कुत्र्याने अक्षरशः लचके तोडले. अतिरक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे.

एक दिवसाच्या नकोशीला फेकले रस्त्याच्या बाजूला; कुत्र्यांनी लचके तोडल्याने मृत्यू

संशयित माता पिता विरोधात गुन्हा दाखल: काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाज मन सुन्न झाले आहे. हे घटना परिसरातील मुलांच्या सकाळी लक्षात आल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करताना पोलिसांचे डोळे भरून आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात संशयित माता पिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिला व एक व्यक्ती पिशवीत अर्भक घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना याची माहिती: पोलिसांनी दिलेली माहितीनुसार चुंचाळे शिवारातील, दत्तनगर मधील फ्लॅट क्रमांक 54 मधील एका घराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ एक दिवसाच्या या बालिकेला रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. हा प्रकार स्थानिक मुलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले.

उपचारापूर्वीच मृत्यू झाला: या अर्भकाचा उजवा हात, पाय गुडघ्यापर्यंत कुत्र्याने खाऊन टाकला होता. गंभीर अवस्थेत या अर्भकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.