नाशिक - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक घरातच बसून असतात. सध्या रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असल्याने ज्येष्ठांना चांगलाच विरंगुळा झाला आहे. मात्र रामायण पाहत असताना सुद्धा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मास्क घालून अंतर राखत रामायण पाहणे पसंत केले. कोरोनाची खबरदारी घेण्यासाठी ज्येष्ठांनी घालून दिलेल्या आदर्शाची आता परिसरात चांगलीच चर्चा रंगत आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावामुळे सर्व राज्यभरात संचारबंदी जाहीर झाल्यामुळे शहरवासीयांसह ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. दूरदर्शनने पुन्हा एकदा रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका सुरू केल्यामुळे येवल्यातील ज्येष्ठांनी घरातच राहून रामायण व महाभारत बघणे पसंत केले. मात्र या नागरिकांनी अंतर राखून रामायण पाहिले. त्यांच्या या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगत आहे. ज्येष्ठ नागरिक रामायण आणि महाभारत या मालिका बघण्यात सध्या मग्न असल्याचे चित्र शहरात बघण्यास मिळत आहे.