नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील नागरिकांचे सहकार्य मिळत असून, बऱ्यापैकी रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी जात आहेत. प्रशासनाच्या शर्तीच्या प्रयत्नांना यश मिळत असल्यामुळे मालेगाव आज रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे. परंतु, कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी शहरातील ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी स्वत:हून पुढे यावे असे आवाहन आज शहरातील मौलाना, धर्मगुरू तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत संयुक्तपणे करण्यात आले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील मौलना, धर्मगुरूंच्या उपस्थितीत जनजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहराचे आमदार मौलाना मुफ्ती मोहमंद, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयक सुनिल कडासने, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक संदिप घुगे, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, तहसिलदार चंद्रजित राजपूत, यांच्यासह शहरातील मौलाना व धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी नागरिकांनी पुढे यावे, मालेगावातील धर्मगुरूंसह अधिकाऱ्यांचे संयुक्त आवाहन आमदार मुफ्ती म्हणाले की, शहरातील कोरोनाचे रुग्ण बरे होत असताना जरी आनंद होत असला तरी या महामारीत शहराने चांगली माणसे गमावल्याचे दु:ख आहे. शहर आजही पुर्णपणे कोरोनामुक्त झालेले नाही. कोरोनाची ही महामारी परत फिरून येवू शकते. यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. खबरदारी हेच कोरोनावर चांगले औषध असून प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रशासनाच्या मेहनतीने कोरोनावर मात करण्यात यश मिळत असतांना नागरिकांनी खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगत मुफ्ती म्हणाले. कोरोनासारखी महामारी परत फिरून आल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. यासाठी प्रत्येक नागरिकाने नैतीक जबाबदारी स्विकारून शहरातून कोरोना विषाणूचे समुळ उच्चाटनासाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी नागरिकांनी पुढे यावे, मालेगावातील धर्मगुरूंसह अधिकाऱ्यांचे संयुक्त आवाहन कोरोनामुक्तीच्या अनुषंगाने रोलमॉडेल ठरणाऱ्या मालेगाव पॅटर्नचे खरे मानकरी आरोग्य प्रशासनासह सर्व शहरातील नागरिक आहेत. प्रचंड वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्या आहेत. याच कालावधीत धर्मभेदाला फाटा देत माणूसकीचे दर्शनही अनुभवायला मिळाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी एकट्या प्रशासनाची नसून सर्व समाज एकवटून कोरोनाचा सामना करतांना समन्वयक म्हणून एक वेगळाच अनुभव आल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयकसुनिल कडासने यांनी यावेळी सांगितले. .
कोरोनाच्या प्रायमरी टेस्टसाठी डिजीटल एक्स-रे सुविधा शासनाने उपलब्ध केल्याचे सांगत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम म्हणाले की, ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनच्या आदेशातून मोठ्या प्रमाणात मोकळीक मिळाल्यानंतर शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) वगळता इतर भागातील दुकाने सुरू झाली आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन होतांना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी कारवाई होणे अपेक्षीत नसून समाज प्रबोधनातून याची अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे. शहरातील मौलाना व धर्मगुरूच्या सुचनांचा नागरिक अंमल करतात, याच उद्देशाने आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचना व आरोग्य सेतु ॲप बाबत स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कोरोनाच्या समुळ उच्चाटनासाठी नागरिकांनी पुढे यावे, मालेगावातील धर्मगुरूंसह अधिकाऱ्यांचे संयुक्त आवाहन ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत प्रतिबंधीत क्षेत्र वगळता शहरातील व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाले असल्याचे सांगत अप्पर पोलीस अधिक्षक संदिप घुगे म्हणाले की, रात्रीची संचारबंदी अजूनही लागू असून त्याची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करावी. वाहतुकीचे नियम पाळणे, कामाशिवाय घराबाहेर फिरणे टाळावे, हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद असून त्याचा अंमल व्हावा, असे सांगतांना पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसह मदतीसाठी सदैव तयार आहे. जीवनावश्यक वस्तुंसोबत गरजूंना मास्कचे वितरण करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.यावेळी डॉ. हितेश महाले म्हणाले की, कोरोनाची लक्षणे दिसत नसणारी सुमारे 70 ते 80 टक्के पॉझिटीव्ह रुग्ण मालेगाव शहरात आढळून आले होते. प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसींग व रुग्णांचे तत्काळ विलगीकरणासह जनजागृती व नागरिकांनी आरोग्य प्रशासनाच्या सुचनांचे पालनामुळेच आज हे यश दिसत आहे.