ETV Bharat / state

नाशिकमध्ये 'रेमडेसिवीर' गैरवापराबाबत ६८ रुग्णालयांना बजावल्या नोटीसा; जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा करण्याचे आदेश - नाशिकमध्ये रेमडिसिवीरचा गैरवापर

रेमडिसिवीरच्या गैरवापराबाबत जिल्हा प्रशासन अँक्शन मोडमध्ये आले असून शहरातील ६८ रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जादा रेमडिसिवीरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. समाधानकारक उत्तर नसल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

Breaking News
author img

By

Published : Apr 27, 2021, 9:20 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील रुग्णालयांकडून होत असलेल्या रेमडिसिवीरच्या गैरवापराबाबत जिल्हा प्रशासन अँक्शन मोडमध्ये आले असून शहरातील ६८ रुग्णालयांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जादा रेमडिसिवीरचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. समाधानकारक उत्तर नसल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

नाशिक

संपूर्ण राज्यासह नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रेमडिसिवीर मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. जिल्हाप्रशासनाने सर्व रुग्णालयांना १३ एप्रिलला प्राप्त रेमडिसिवीर व त्याचा वापर याची यादी जपून ठेवण्यास सांगितले होते. रेमडिसिवीर तुटवड्याच्या तक्रारीनंतर जिल्हाप्रशासनाने मागील आठ दिवसांपासून रुग्णालयाचा इंजेक्शन डाटा तपासण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात ३२५ पैकी २९४ रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली असून ६८ रुग्णालये रेमडिसिवीरचा अनावश्यक वापर करत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून काही रुग्णांना रेमडिसिवीर इंजेक्शन दिले की, ते लगेच बरे होत असल्याचा गैरसमज आहे. शासनाने ठरवून दिलेल्या आदर्श प्रमाणापेक्षा इंजेक्शन वापराचा अतिरेक होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय इंजेक्शन हे रुग्णालयांनी रुग्णांना उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, काही रुग्णालये इंजेक्शन मिळविण्याची जबाबदारी रुग्णांची असल्याचे सांगत अतिशय चुकीचा पायंडा पाडत आहेत. त्यामुळे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांची फरफट होत आहे. १० एप्रिलच्या पत्रानुसार रुग्णालयांनी इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. शेडयुल 'ए' नुसार रुग्णालये स्वत: रेमडिसिवीर खरेदी करू शकतात. तसेच जिल्हा प्रशासनाकडून केंद्रीय पद्धतीने त्यांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. अनावश्यकपणे प्रत्येक रुग्णाला रेमडिसिवीर लिहून देणे थांबवले तर या औषधाचा तुटवडा कमी होऊन रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ कमी होईल, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.