नाशिक - पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांना कोणी विचारत नाही, असे मत अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. तसेच मी शिवसेनेत किंवा कॉँग्रेसमध्ये असतो तर मुख्यमंत्री राहिलो असतो. मात्र, याची मला खंत नसून हे बाळासाहेब सुद्धा मान्य करायचे. लोकसंग्रह हा राजकारणात काम करणाऱ्या आमच्यासारख्यांची खरी संपत्ती आहे. जर लोक सोबत नसतील तर राजकारण संपलं असते, असेही भुजबळांनी यावेळी सांगितले आहे. भुजबळ फॉर्म निवासस्थानी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ओबीसींच्या कारणामुळे मी शिवसेना सोडली -
ओबीसींच्या कारणामुळे मी शिवसेना सोडली, असेही ते म्हणाले. तर त्यानंतर मला काँग्रेससह इतर पक्षांचंही आमंत्रण होतं. मुख्यमंत्री पदाचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांची साथ पकडली आणि पवार साहेबांनी मला उपमुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्री होण्याची मला अजिबात इच्छा नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - भाजप नेते गिरीश महाजांना करायचंय चित्रपटात काम, निर्मात्याला म्हणाले, एक संधी द्या!
पद गेल्यावर असे अनेक माजी मुख्यमंत्री आहे की ज्यांना कोणी विचारत नाही. लोकांचं मला भरपूर प्रेम मिळतं. याशिवाय काल उद्धव ठाकरे यांनी फक्त दसऱ्याची फटकेबाजी केली नाही तर विविध विषयांवर ते बोलले. आपल्या घरात सात-आठ दिवस छापा सुरू आहे. हे कोणाला आवडत नाही, असे म्हणत केंद्रीय संस्थांकडून सुरू असलेल्या कारवाईवर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
फडणवीस हे क्लीन चिट मास्टर -
फडणवीस यांच्यात भ्रष्टाचार आरोप असलेला गुण हा उद्धव ठाकरे यांच्यात नाही. फडणवीस हे क्लीन चिट मास्टर, हा अवगुण आहे, असे मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल नाही बोलू शकत, असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री यांना भुजबळ यांनी कोपरखळी लगावली आहे. यादरम्यान मुंढे भाऊ-बहीण यांच्यात कलगीतुरा सुरू असून कधीतरी शांत होईल, असे म्हणत त्यावर बोलण टाळले.