नाशिक New Drug Smuggler In Nashik : संशयित ड्रग्जमाफिया ललित पाटीलच्या प्रकरणानंतर रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. असेच नवीन एमडी ड्रग्जचे प्रकरण नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष पथकाने सोलापूरमधील कारवाईनंतर समोर आणले आहे. (MD Drugs Factory Destroyed) नाशिक पोलिसांच्या हाती लागलेला ड्रग्ज माफिया संशयित सनी अरुण पगारे हा चक्क सोलापूरात एमडीचा कारखाना चालविला होता. (Nashik Crime) या ठिकाणी तो रोज करोडो रुपयांचे एमडी ड्रग्ज तयार करत त्याची नाशिकमध्ये एजंट मार्फत विक्री करत असल्याचं पुढे आलं आहे. नाशिकच्या तीन पथकांनी सोलापूरातील मोहोळ येथे जाऊन हा कारखाना उध्वस्त करत 6 किलो 600 ग्रॅम इतका एमडी पावडरचा साठा, कच्चा माल व साहित्य असा सुमारे 10 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याचं नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितलं. (MD Drugs Nashik)
'क्लिनिग' रसायनच्या नावाने ड्रग्ज निर्मिती: ड्रग्ज माफिया सनी पगारे याने सोलापूर मोहोळ येथे अंकुश चव्हाण यांच्या मालकीची एक बंद पडलेली स्वामी समर्थ नावाची रासायनिक कंपनी मित्र मनोहर काळे यांच्या करारनाम्याने भाडेतत्त्वावर घेतली. त्यामध्ये तो एमडी ड्रग्ज निर्मितीचा उद्योग चालवत होता. नाशिकच्या एमडी ड्रग्जच्या प्रकरणात पगारे याला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत पगारेने ड्रग्ज कारखाना चालविला असल्याची खात्री पटल्यानंतर नाशिकहून तीन पथके सोलापूरच्या दिशेने रवाना झाली. शुक्रवारी सकाळपासून पथकाने मोहोळ भागात कारवाई करत तेथून 6 किलो 600 ग्रॅम शुद्ध एमडी पावडरसह एमडीचे 14 किलो 230 ग्रॅम पावडर जप्त केले. तसेच सोलापूरातूनसुद्धा एका संशयिताला चौकशीसाठी या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात दोन संशयित फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
असा सुरू झाला तपास: नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 7 ऑक्टोबर रोजी नाशिक रोड परिसरात ड्रग्जची विक्री करणारा गणेश शर्मा याला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून 12.5 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं होतं. त्याने हे एमडी ड्रग्ज गोविंद साबळे व आतिश चौधरी यांच्याकडून खरेदी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर अंमली पदार्थ खरेदी विक्रीचे मोठे जाळे निर्माण करणाऱ्या नाशिकरोड भागातील आरोपी सनी पगारे, अर्जुन पिवाल, मनोज गांगुर्डे, सुमित पगारे यांनाही अटक करण्यात आली होती. यात आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान सखोल तपास केला गेला. यामध्ये आरोपी मनोज गांगुर्डे यांच्याकडून 1 किलो 27 ग्रॅम, सनी पगारे कडून 2 किलो 63 ग्रॅम, अर्जुन पिवाल याच्या कडून 58 ग्रॅम वजनाचा असा करोडो रुपयांचा एमडी ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला होता.
हेही वाचा: