ETV Bharat / state

NCP Politics Crisis: छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशाने भाजप आमदारांचे मंत्रीपद हुकणार? राजकीय विश्लेषक म्हणतात...

राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ओबीसी नेते आणि नाशिक जिल्ह्याचे आमदार छगन भुजबळ यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने नाशिक जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळाले आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात चार मंत्री पद आहेत. अनिल पाटील, गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि भुजबळ यांचा समावेश आहे. त्यामुळे आता भाजपची संधी हुकल्याचे म्हटले जात असल्याचे मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भाजप आमदारांचा मात्र हिरमोड झाला आहे, असे राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे म्हटले आहेत.

NCP Politics Crisis
छगन भुजबळ
author img

By

Published : Jul 4, 2023, 7:41 AM IST

राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांची मंत्रीमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया

नाशिक : नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अपेक्षितरित्या सत्तेत सहभागी होताना अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे राष्ट्रवादीसह ओबीसी कार्यकर्ते देखील अडचणी आले आहेत. छगन भुजबळ यांच्यासह काही आमदार अजित पवारयांच्या सोबत गेले असले तरी पक्ष संघटनेचे मूळ पदाधिकारी मात्र आता मोठ्या साहेबांना साथ द्यायची की, अजित पवार व भुजबळ यांच्या तंबूत दाखल व्हायचे अशा पेचात आहे. रविवारी मुंबईमध्ये अनेक पदाधिकारी गेले असते तरी येत्या काही दिवसातील घडामोडी बघून ते संभाव्य वाटचालीबाबत निर्णय घेतील असे चित्र आहे.

'हे' भाजप आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक : शिंदे -भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोजक्याचा आमदारांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. या मंत्रिमंडळात भाजपकडून दोन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांची नावे चर्चेत होते. तसेच फरांदे या नाशिक मध्य विधानसभा संघातून विजयी झाल्या, तर हिरे यांनी ना​शिक पश्चिम मतदारसंघात बाजी मारली. फरांदे यांनी यापूर्वी उपमहापौरपद सांभाळले आहे. त्यांच्याकडे प्रशासन चालवण्याचा अनुभव आहे.

अचानक राजकीय भूकंप : पक्षात दांडगा जनसंपर्क आणि एकनिष्ठ काम यामुळे फरांदे यांचे नाव पुढे आले आहे. राष्ट्रीय सेवक संघ आणि भाजपाशी एकनिष्ठ राहिलेल्या स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या स्नुषा म्हणून सीमा हिरे यांच्या नावाला पंसती आहे. स्वामी समर्थ केंद्राचे मोरे दादा यांचे नातलग आणि तीन वेळा नगरसेवक म्हणून केलेल्या कामांची दखल पक्ष घेऊ शकतो, अशी शक्यता होती. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार दादा असे यांना मंत्री पद दिल्यानंतर आणखी एक मंत्रिपद नाशिक जिल्ह्याला मिळेल अशी आशा होती. त्यामुळे हिरे आणि फरांदे यांनी तसा जोरही लावला होता. मात्र, अचानक राजकीय भूकंप होत राष्ट्रवादीचे आमदार सरकारमध्ये सामील झाले. नाशिक जिल्ह्यातील आमदार छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपची संधी हुकल्याचे म्हटले जात असल्याने मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या भाजप आमदारांचा मात्र हिरमोड झाला आहे.

कॉंग्रेसच्या नऊ आमदारांना मंत्रिपद : सगळे समीकरण बदलली आहे, जो मंत्रिमंडळ विस्तार वर्षभरापासून रखडला होता. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. परंतु, कोणालाच मंत्रीपदाची संधी मिळत नव्हती, अशात अजित पवार आले आणि एका झटक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नऊ आमदारांना मंत्रिपद दिले. त्यामुळे आता शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे आमदार असेल जे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यांना मर्यादा आल्या आहेत. अजून एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जातं आहे, मात्र त्यातही अजित पवार यांनी म्हटले की त्यांचे काही आमदार मंत्रिमंडळात येऊ शकतात. त्यामुळे भाजपचे जे इच्छुक आमदार होते त्यांना कदाचित हात चोळत बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : 'जो जसे करतो त्याला तसे फळ मिळते', महाराष्ट्राच्या राजकीय संकटावर भगतसिंह कोश्यारींची चुटकी
  2. Maharashtra Political Crisis: भाजपचे राजकारण जनतेला अमान्य, निवडणुकांमध्ये चित्र स्पष्ट होणार
  3. Maharshtra Political Crisis : राष्ट्रवादीतील भूकंपाचा आज दुसरा अध्याय, पटेल-तटकरेंची हकालपट्टी, तर अजित पवारांनी नेमले नवीन प्रदेशाध्यक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.