ETV Bharat / state

भुजबळांनी पांघरली सेनेची भगवी शाल, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत - chhagan bhujbal ncp

भुजबळांनी येवल्यातूनच विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्यावतीने बसवलेल्या गणपतील भेट दिली. कार्यकर्त्यांनी भुजबळांना भगवी शाल घालत शिवसेनेत येण्याची विनंतीसुद्धा केली आहे.

छगन भुजबळ
author img

By

Published : Sep 5, 2019, 3:53 AM IST

Updated : Sep 5, 2019, 8:31 AM IST

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना शिवसेना शाखा महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी 'कोण आला रे, कोण आला' 'शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणा देत भुजबळांचे जोरदार स्वागत केले.

भुजबळांनी पांघरली सेनेची भगवी शाल

हेही वाचा - पुढचा विरोधी पक्षनेता नव्हे, पुढचा मुख्यमंत्रीच आमचा - प्रकाश आंबेडकर

मागील काही दिवसांपासून भुजबळ हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, यात अजून रंगत येत असल्याचे दिसत आहे. भुजबळांनी मी येवल्यातूनच विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्यावतीवने बसवलेल्या गणपतील भेट दिली. कार्यकर्त्यांनी भुजबळांना भगवी शाल घालत शिवसेनेत येण्याची विनंतीसुद्धा केली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या ४५ लाख, मुख्यमंत्री काय करतायेत? अजित पवारांचा सवाल

भुजबळ म्हणाले, 'या शिवसेनेच्या शाखेचे माझ्याच हाताने उद्घाटन झाले होते.' अशाप्रकारे त्यांनी शिवसेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येवला मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले मात्र, कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. भुजबळांना शिवसेनेत येण्यास काही शिवसैनिक विरोध करत असले तरी काही शिवसैनिक भुजबळांना समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. भुजबळांनी मात्र दोन दिवसांपूर्वी मी जिथे आहे तिथे मला राहू द्या असे म्हटले होते. मात्र, आजच्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे भुजबळांच्या सेना प्रवेशाच्या विषयाला अजून तरी पूर्ण विराम मिळाला नाही असेच म्हणता येईल.

हेही वाचा - नाशिकमध्ये बैठक शिवसेनेची, चर्चा मात्र भुजबळ प्रवेशाची

- आठवलेंचे छगन भुजबळांना आमंत्रण.. म्हणतात शिवसेनेत न जाता आरपीआयमध्ये यावे

Intro:शिवसेनेची भगवी शाल पांघरत,भुजबळ म्हणालेत मी येवल्यातूनचं उमेदवारी करणार...

Body:राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे,छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवसेना पक्षाच्या पहिल्या शाखेच्या, महाराष्ट्र मित्र मंडळा च्या गणपती मंडळाला त्यांनी भेट दिली,ह्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "कोण आला रे आला कोण आला" शिवसेनेचा वाघ आला" अशा घोषणा देत भुजबळांचं जोरदार स्वागत केलं,तसेच ह्या वेळी कार्यकर्त्यांनी भुजबळांना भगवी शाल घालत शिवसेनेत येण्याचं साकडं घातलं, ह्या वेळी प्रतिक्रिया देतांना भुजबळांनी सुद्धा शिवसेनेच्या जुन्या आठवनींना उजाळा देत,मी येवला मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं मात्र कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे,भुजबळांना शिवसेनेत येणास काही शिवसैनिक विरोध करत असले तरी काही शिवसैनिक भुजबळांना समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे..भुजबळांनी मात्र दोन दिवसांन पूर्वी मी जिथे आहे तिथं मला राहू द्या असं म्हटलं होतं मात्र आजच्या त्यांच्या प्रतिक्रिया मुळे भुजबळांच्या सेना प्रवेशा बाबच्या विषयाला अजून तरी पूर्ण विराम मिळाला नाही असंच म्हणता येईल..

बाईट छगन भुजबळ
फीड ftp
nsk bhujbal on Sena

Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 8:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.