ETV Bharat / state

जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आलं तर हुकूमशाही येईल - शरद पवार

भाजप पुन्हा सत्तेत आली तर देशात हुकूमशाही येईल... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची घणाघाती टीका... म्हणाले राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी म्हणजे लबाडा घरचं अवताण

शरद पवार
author img

By

Published : Mar 4, 2019, 5:30 PM IST

नाशिक - राज्यात आणि केंद्रातील सरकारला गेल्या साडेचार वर्षात प्रत्येक निर्णयात अपयश आले आहे. केंद्र सरकारची नोटबंदी प्रमाणे राज्यातील कर्जमाफीदेखील फसली आहे, शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. शेतकऱ्यांना हे सरकार १७ रुपयांची मदत देत आहे. मात्र, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे. हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचे अवताण असून जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आले तर हुकूमशाही येईल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार

शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील सरकारवरही निशाणा साधला.
पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्याबद्दल बोलण योग्य नाही. पंतप्रधानांनी बोलताना जपून बोलले पाहिजे, असा सल्ला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या रूपाने देशात आपत्ती आली आहे. त्यामुळे संकुचित विचार करणाऱ्यांच्या हातात हा देश नको असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पवार म्हणाले, शेतकऱ्यांना ६ हजार नको, शेतीमालाला किंमत द्या. हे सरकार शेतकऱ्यांना दररोज १७ रुपये मदत देत आहे. मात्र, रोजगार हमीवर काम करणाऱ्यालादेखील ३५० रुपये रोजगार मिळतो. त्यामुळे सरकारने दिलेली मदत म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला. संपूर्ण शेती अर्थव्यवस्था संकटात आली असून हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचं अवताण आहे, यांच्याकडून आश्वासनाशिवाय काही मिळत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

अंबानीवरही निशाणा -

यावेळी बोलताना पवारांनी राफेल प्रकरणावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. राफेलची किंमत ५३० कोटी रुपये होती. मनमोहन सिंग सरकारने घासाघीस करून ही किंमत ठरवली होती. मात्र, आता तेच विमान १६०० कोटीत घेतले जात आहे. संरक्षण खात्यात खरेदीसाठी एजंट नसावा अशी सरकारची भूमिका होती. मात्र, यांनी एजंट नेमला असल्याचा आरोपही पवरांनी केला. अंबानी या क्षेत्रातील अत्यंत ज्ञानी माणूस आहेत, म्हणूनच त्यांना राफेलचा ठेका दिला असल्याची उपरोधिक टीकाही पवारांनी यावेळी केली.

undefined

Intro:नाशिक राष्ट्रवादी कॉग्रेस मेळावा शरद पवार ऑनलाइन

Body:नाशिक राष्ट्रवादी कॉग्रेस मेळावा शरद पवार ऑनलाइन

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.