येवला (नाशिक):- येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे हिला राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यालाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. 2018 साली गणेश उत्सवमध्ये लायटिंगच्या माळेला चिटकलेला आठ वर्षीय ज्ञानेश्वर परसुरे या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल दिव्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
घरात आनंदाचे वातावरण
केंद्रीय गृहमंत्र्यालाकडून पुरस्कार जाहीर होताच दिव्याचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालक सोमनाथ काळे यांचा देखील आनंद द्विगुणित झाला आहे. एकंदरीत घरात आनंदाचे वातावरण आहे.