नाशिक - पूर्वीच्या काळी ज्याप्रकारे सर्व कुटुंब हि गुण्यागोविंदाने संयुक्त कुटुंब पद्धतीत वागत होती. त्याचे आज प्रमाणात तुरळक झाले आहे. मात्र 15 मे या राष्ट्रीय कुटुंब दिवसाच्या ( National Family Day ) निमित्ताने ईटीव्ही भारत च्या प्रतिनिधीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील हातनोरे गावातील अशाच एका संयुक्त कुटुंबाचा आढावा घेतला आहे. या कुटुंबात आठ-दहा नाही तर, तब्बल 26 जणांचे कुटुंब एकत्रित सुखाने ( family of 26 staying happily ) राहतात. सुख दुःखात कुटुंब एकत्र असल्याने आधार होत असल्याचे कुटुंबातील सदस्य सांगतात.
26 सदस्यांचे कुटुंब - आजच्या आधुनिक युगात विभक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकत्र कुटुंब पद्धतीच खऱ्या अर्थाने कुटुंबाला व समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याने एकत्र कुटुंब पद्धती राहणारे सदस्य सांगतात. नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावरील हातनोरे गावात माधव पांडुरंग बोरस्ते यांचे घर आहे. शेती हा यांचा मूळ व्यवसाय आहे. विशेष म्हणजे हे बोरस्ते कुटुंब आज ही एकत्रित राहतात. या कुटुंबात 4 भाऊ, 4 महिला, 5 मुले, 5 सुना, 5 नातू, तीन नाती असा परिवार आहे. याच कुटुंबातील 8 मुलींची लग्न झाल्याने त्या आपल्या सासरी असतात.
एकत्र कुटुंब पद्धतीचे समाधान - आमची पाचवी पिढीपासून आम्ही एकत्र कुटुंब पध्दतीत राहत आहेत, आज आमच्या कुटुंबात 26 सदस्य आहेत. गावात आमाची शेती असून या शेतीत आम्ही द्राक्ष, कांदा, ऊस तसेच इतर पालेभाज्याचे उत्पादन घेतो. शेती कामात घरातील पुरुषांसोबत घरातील महिलांचा देखील हात भार लागतो. आमच्या भावांमध्ये एकजूट असल्याने मालमत्तेचे हिस्से वाटे पडले नाहीत. एकाच स्वयंपाक घरात सगळ्यांसाठी जेवण बनते. एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्याचा आनंद वेगळा आहे. प्रत्येकाच्या सुखा दुखात सहभागी होता येत असल्याचे समाधान वाटत असल्याचे कुटुंब प्रमुख माधव बोरस्ते सांगतात.
एकत्र कुटुंब पद्धतीसाठी अभ्यासक्रम - भोपाळमधील बरकतुल्ला विद्यापीठाने सामाजिक व नैतिक मूल्यांवर आधारित एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. त्यात एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाणाऱ्या मुलींना जुळवून घेताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय यांचा विचार करण्यात आला आहे. एकत्र कुटुंब पद्धती जास्त चांगल्या प्रकारे चालावी हा या अभ्यासक्रमाचा हेतू असून मुलींना त्याचा फायदा होतोय.
हेही वाचा - Akbaruddin Owaisi : 'श्वान भुंकतोय भुंकू द्या, उत्तर देऊ नका'; अकबरुद्दीन ओवेसींची जीभ घसरली, म्हणाले...