ETV Bharat / state

आदर्श गावाचा 'आदर्श' उप्रकम; किकवारी खुर्द गावात लोकवर्गणी व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने किकवारी खुर्द येथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. शासनातर्फे मदत मिळण्याची ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र, शासनाने गावाच्या परस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनीच लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन लाखो रुपये जमा केले आणि त्यातून गावात जलसंधारणाची कामे केली.

आदर्श गावाचा आदर्श उप्रकम
author img

By

Published : Jul 8, 2019, 12:03 PM IST

नाशिक - पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागातले किकवारी खुर्द हे एक छोटेसे गाव. या गावाने 'संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना'त भाग घेत शासनाच्या विविध उपक्रमातील अनेक पुरस्कार पटकावले. निर्मलग्राम, स्मार्ट व्हिलेज सारख्या विविध संकल्पना राबवून या गावाने आपला ‘आदर्श’पणा जपला. यावर्षी पडलेल्या दुष्काळाने किकवारी खुर्द गावावर पाणी टंचाईचे सावट पसरले. शासन यावर काहीतरी सोय करेल या अपेक्षेने मदतीची वाट बघून-बघून गावकरी थकले. शेवटी गावाला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ स्वत:च सरसावले. लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी पैसे गोळा केले आणि त्यातून गावात जलसंधारणाची कामे करून 'आदर्श' गावाचा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

गावात लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाबद्दल बोलताना सरपंच केदा बापू काकुळते

किकवारी खुर्द गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने सध्या येथे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला, नदी,नाले, धरणे कोरडी पडली आहेत. या गावातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. तसेच येथील तरुणांना रोजगार नसल्याने त्यांचा शेतीवरच उदरनिर्वाह होतो. यावर्षी शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सध्या पाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे. तर अत्यल्प पावसामुळे विहिरींनीही तळ गाठला आहे. कृषी विभाग, वनविभाग व महाराष्ट्र शासन दुष्काळ निवारण्यासाठी काहीतरी उपयोजना करतील. शासनाने बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला, त्यावर शासन काहीतरी ठोस पाऊले उचलेल, जलसंधारणेची कामे केली जातील याची वाट किकवारी ग्रामस्थांनी पाहिली. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेल आणि मग शासनाची जलसंधारणेच्या कामांची सुरुवात होईल, या अपेक्षेने ग्रामस्थ थांबले. परंतु, आचारसंहिता संपून बराच काळ लोटला. त्यामुळे ग्रामस्थांनी आता शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न ठेवता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून पुढे सरसावण्याचे ठरवले. आदर्श ग्रामचे शिल्पकार सरपंच केदा बापू काकुळते यांनी त्वरित ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा केले.

गावाला लाभलेल्या दिड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने चरी खोदुन नदीचे पुनर्जीवन केले गेले. तसेच गावाच्या उत्तरेस असलेल्या ब्राम्हणदर, वाघदर या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नाल्यावर ठिकठिकाणी बांध घालून पाणी अडविण्यात आले. गावात सध्या चार जेसीबी, पोकलेन व ट्रॅक्टरच्या साह्याने गेल्या दहा दिवसांपासून गावात जलसंधारणाची कामे सुरु असून दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी किकवारी वासियांनी दर्शवली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी वाहून न जाता जीमिनीत मुरेल आणि जलसंचयात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जून महिना संपूनही अद्याप पाऊस पडलेला नाही तसेच पाण्याची पातळी मोठ्ठ्या प्रमाणात खालावली आहे. यावर उपाययोजना म्हणून किकवारी या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सहकाराने जलसंधारणाची कामे केली.

आमच्या गावाला व आजूबाजूला भरपूर प्रमाणात जंगले होती. ती बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्याने आज पर्यावरणाचा ऱ्हास झाला. महाराष्ट्रातील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, वनसंपदा नष्ट करणाऱ्यांवर ठोस कार्यवाही करीत नाहीत. तसेच आमचा भाग गुजरातजवळ आहे त्यामुळे आमच्या भागातील जंगले ही गुजरात वनविभागाशी जोडून द्यावीत जेणेकरून वनांचे रक्षण होईल, अशी मागणी सरपंच केदा बापू काकुळते यांनी केली आहे.

Intro:नाशिक मधील किकवारी खुर्द हे गाव पश्चिम पट्यातील डोंगराळ भागातील एक गाव मात्र, आदिवासी बहुल भागातील या गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेऊन शासनाने अनेक पुरस्कार देऊन गावाचा गौरव केला आहे. निर्मलग्राम,स्मार्ट व्हिलेज ह्या संकल्पना राबवून गावाने ‘आदर्श’ पणा जपला आहे.Body:आदिवसी बहुल व डोंगराळ भागात किकवारी खुर्द हे गाव असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.विहिरींनी तळ गाठला,नदी,नाले,धरणे कोरडी पडली आहेत मात्र शेती हाच या गावातील नागरिकांचा व्यवसाय असल्याने व तरुणवर्गास नोकऱ्या नसल्याने शेतीवरच उदरनिर्वाह असल्याने शेतीस पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला आहे.यावर्षी तर अत्यल्प पावसामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. मात्र कृषी विभाग,वनविभाग व महाराष्ट्र शासन दुष्काळ निवारण्यासाठी काहीतरी उपयोजना करेन तसेच शासनाने बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासन काहीतरी ठोस पाऊले उचलून जलसंधारणेची कामे करेल याची वाट किकवारी ग्रामस्थांनी पहिली मात्र, मध्यंतरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेल आणि मग शासनाची जलसंधारणेच्या कामांची सुरुवात होईल या अपेक्षेने ग्रामस्थ थांबलेत परंतु आचारसंहिता संपून बराच काळ लोटल्यानंतर ग्रामस्थांनी आता शासनाच्या निधीची व मदतीची अपेक्षा न ठेवता लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून आपण पुढे सरसावले पाहिजे ही भूमिका घेऊन आदर्श ग्रामचे शिल्पकार केदा बापू काकुळते यांनी त्वरित ग्रामसभा घेऊन आपली भूमिका मांडली व सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून लाखो रुपये जमा केलीत.Conclusion:गावाला लाभलेल्या दिड किलोमीटर लांबीच्या हत्ती नदीवर जेसीबीने चारी काढून खड्डे करून नदीचे पुनर्जीवन केले.तसेच गावाच्या उत्तरेस असलेल्या ब्राम्हणदर,वाघदर या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नाल्यानावर ठिकठिकाणी बाध घालून पाणी अडविण्याचे मातावाचे काम केले.गावात साध्य चार जेसीबी,पोकलेन व ट्रक्टरच्या साह्याने गेल्या दहा दिवापासून गावात जलसंधारनाची कामे सुरु असून दुष्काळाशी दोन हात करण्याची तयारी किकवारी वासियांनी दर्शवली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोट्यवधी लिटर पाणी वाहून न जाता जीमिनीत मुरणार आहे त्यामुळे जलसंचयात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जून महिना संपूनही अद्याप पाऊस पडलेला नाही तसेच पाण्याची पातळी मोठ्ठ्या प्रमाणात खालावलेली आहे. या वर उपयोजना म्हणून किकवारी या गावाने जलसंधारणाची कामे करून आपल्या आदर्श गावाचा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
आमच्या गावाला व आजूबाजूला भरपूर प्रमाणात जंगले होती. ती बऱ्याच प्रमाणात नष्ट झाल्याने आज पर्यावरणाचा ऱ्हास झाला, महाराष्ट्रातील वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत वनसंपदा नष्ट करणाऱ्यांवर ठोस कार्यवाही करीत नाहीत म्हणून गुजरातला जवळच आमचा भाग आहे म्हणून आमच्या भागातील जंगले ही गुजरात वनविभागाशी जोडून द्यावेत जेणेकरून वनांचे रक्षण होईल अशी मागणी – केदा बापू काकुळते,सरपंच यानी केलीय
केदा काकुळते बाईट..1
यशवत धोडगे बाईट..2
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.