ETV Bharat / state

Nashik Road Issue : झोळीतून दवाखान्यात नेताना गर्भवतीचा मृत्यू, मृतदेह आणतानाही नातेवाईकांची अडीच किलोमीटरची पायपीट - नाशिक गर्भवती महिला मृत्यू

प्रसववेदना होत असल्याने वनिता भगत या गरोदर महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताना अडीच किलोमीटर चिखल पायाखाली तुडवावा लागला. कारण काय? तर गावात रस्ता नाही, साहजिकच वाहतुकीची सुविधा नाही. एवढे करुनही त्या माऊलीचे प्राण वाचले नाहीत. तिच्या उदरातल्या निष्पाप जीवाला बाहेरचे जग पाहता आले नाही. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील ही ह्रदयद्रावक घटना आहे.

Nashik Road Issue
नाशिक रस्ते प्रश्न
author img

By

Published : Jul 26, 2023, 1:37 PM IST

Updated : Jul 26, 2023, 3:10 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जूनवणेवाडी या आदिवासी वस्तीला जवळच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे सात महिन्यांची गरोदर असलेल्या वनिता भगत या महिलेला प्रसूती वेदना होत असताना रुग्णालयात जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावरून अडीच किलोमीटर पायपीट करावी. त्यानंतर कुटुंबीयांनी झोळी करत रुग्णालय गाठले. मात्र या काळात वेदनांची तीव्रता असह्य झाल्यामुळे उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव घरी नेण्यासाठीही झोळी करावी लागल्याने या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे

शासनाकडून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र इगतपुरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात विकासाच्या नावाखाली फक्त वल्गना करणाऱ्या शासन यंत्रणांच्या कारभाराचा फटका आदिवासी नागरिकांना बसत आहे. गावाला रस्ता नसल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा झोळी! - प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्याने असल्याने वनिता भगत या गरोदर महिलेला आपल्या नातेवाइकांसह चिखलातून अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली. त्यानंतर तिला झोळीतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान प्रसूती वेदना आणि पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे या महिलेने दवाखान्यात पोहोचताच अखेरचा श्वास घेतला. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी सुद्धा चक्क झोळीचा वापर करावा लागला.

फक्त विकासाचे स्वप्न- करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना आहे. जूनवणेवाडी या गावात रस्ता करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यावधी रुपयांचे रस्ते करण्याऐवजी जूनवणेवाडी सारख्या अनेक गावात रस्ते नाहीत.

आरोग्य सुविधा मिळण्यास विलंब होत असल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत- 'एल्गार' संघटनेचे पदाधिकारी भगवान मधे

पालघर, मोखाडामध्येही हीच परिस्थिती- काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ठाणेलगत पालघर जिल्ह्यातील सुरेखा भागडे या गरोदर महिलेलादेखील अशाच प्रकारे झोळी करून दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तसेच मोखाडा तालुक्यातील शेंडेपाडा या गावालाही रस्ता नसल्याने तसेच नदीला पूर असल्याने प्रसूती वेदना होत असलेल्या एका महिलेलादेखील झोळी करून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा-

  1. Palghar Flood : गरोदर महिलेचा रस्त्याअभावी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास; पालघरमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ

Last Updated : Jul 26, 2023, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.