ETV Bharat / state

नाशिकमध्ये १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १८७ गुन्हेगार तडीपार, ५० रडारवर

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ५० गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत.

नाशिक
author img

By

Published : Jul 30, 2019, 2:19 PM IST

नाशिक - शहरातील वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर तब्बल १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ५० गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत.

नाशिक पोलिसांची धडक कारवाई

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तर, ५० गुन्हेगार कारवाईच्या रडारवर आहेत. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे.

दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीचे अस्त्र डागले जात असल्याने बहुतांशी गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले आहे. तर, टोळक्यात गुन्हे करणाऱ्या पाच टोळ्यांवरही कारवाईची कट्यार चालवण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांवर देखील करडी नजर ठेवली जात असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नुकतेच टिप्पर गँगचा छोटा पठाण आणि त्याचा एक साथीदार जामिनावर बाहेर आला होता. या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. या कारवाईचा धसका घेत जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांनी शहरातून पळ काढला आहे.

पोलीस ठाणेनिहाय तडिपारीची कारवाई

परिमंडळ १ : अंतर्गत आडगाव (५), म्हसरुळ (९), पंचवटी(२६), सरकारवाडा(१७), भद्रकाली(६९), गंगापूर(९), मुंबईनाका(८), असे १४३ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.
परिमंडळ २ : अंतर्गत नाशिकरोड (३), देवळाली कॅम्प (२), सातपूर (११), अंबड (२०), इंदिरानगर (४), उपनगर(४) अशा एकूण ४४ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

Intro:नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त विश्वास
नांगरे-पाटील यांनी धडक कारवाईचे आदेश दिल्या नतंर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून जानेवारी ते जुलैअखेर तब्बल १८७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहेत. आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगार तडीपार कारवाई करण्यात आली आहेBody:परिमंडळ १ चे उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील
परिमंडळ २ चे उप आयुक्त अमोल तांबे यांनी
धडक कारवाई केली. आणखी ५० गुन्हेगार तडीपार कारवाईच्या रडारवर आहेत.दोन पेक्षा अधिक गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर तडिपारीचे अस्त्र डागले जात असल्याने बहुतांशी गुन्हेगारांनी
शहरातून पलायन केले आहे. कारवाई एवढ्यावरच न थांबता टोळी करून गुन्हेगारी
कारवाई करणाऱ्या पाच टोळ्यांवर कारवाई
करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई
महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारागृहातील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली जात अाहे.
नुकतेच टिप्पर गँगचा छोटा पठाण अाणि त्याचा एक साथीदार जामिनावर बाहेर अाला अाहे. या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. या कारवाईचा धसका घेत जामिनावर बाहेरConclusion:पोलिस ठाणेनिहाय तडिपारीची कारवाई
परिमंडळ १ मधील आडगाव - ५, म्हसरुळ - ९, पंचवटी
- २६, सरकारवाडा - १७, भद्रकाली - ६९, गंगापूर - ९,
मुंबईनाका - ८ असे १४३ तर परिमंडळ २ - मधील
नाशिकरोड - ३, देवळाली कॅम्प - २, सातपूर - ११, अंबड -
२०, इंदिरानगर - ४, उपनगर - ४ असे ४४ गुन्हेगार.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.