ETV Bharat / state

गुन्हेगारी रोखण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचा 'हा' आहे अॅक्शन प्लॅन

वाढत्या गुन्हेगारीली आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 100 ठिकाणी क्यूआर कोड बसविले असून ह्यासाठी बीट मार्शलच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. यात प्रत्येक दोन तासानंतर नियंत्रण कक्ष अंतर्गत क्यूआर कोडची चेकिंग केली जाणार आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील
author img

By

Published : Jun 26, 2019, 5:06 PM IST

नाशिक - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी 'अॅक्शन प्लॅन'ची आखणी केली आहे. या प्लॅननुसार शहरातील कानाकोपरा 'क्यूआर कोड'ने सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नाचिंग, दरोडा, गोळीबार ह्यासारख्या गुन्ह्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली. यामुळे नागरीकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्याची स्पेशल अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी 5 अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत तडीपारची कारवाई करण्यात आली. शहरातील काही सराईत गुन्हेगारही पोलिसांच्या रडारवर असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आखण्यात आलेल्या अॅक्शन प्लॅनची माहिती देताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 100 ठिकाणी क्यूआर कोड बसिवण्यात आले आहेत. ह्यासाठी बीट मार्शलच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक दोन तासानंतर नियंत्रण कक्ष अंतर्गत क्यूआर कोडची चेकिंग केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

नाशिक शहरात 135 स्लम एरिया आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेंमध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलांचा सहभाग आढळून येत असल्याचे सांगत विश्वास नांगरे पाटील सांगितले. त्यांनी ह्यबाबत चिंताही व्यक्त केली. मात्र असे असले तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनी देखील जागृत राहण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

Intro:गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा एक्शन प्लॅन...

Body:नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलीसांनी एक्शन प्लॅन ची आखणी केली असून शहरातील कानाकोपरा क्यूआर कोड सुरक्षित करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे...

गेल्या काही दिवसांन पासून शहरात चोऱ्या,घरफोड्या,चेन स्नाचिंग,दरोडा,गोळीबार ह्या मुळे शहरातील नागरिकांन मध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याने, नागरीकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमते वर प्रश्न चिन्हे उपस्थित करण्यास सुरवात केली होती,पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आता गुन्हेगारीवर आळा घालण्याची स्पेशल ऍक्शन प्लॅन तयार केला आहे,ह्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांन पूर्वी 5 अटल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्या अंतर्गत ताडीपरिची कारवाई करण्यात आली असून अजून ही काही शहरातील सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर असल्याचे आयुक्तांनी सांगितले,
गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी शहरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 100 ठिकाणी क्यूआर कोड बसवण्यात आले असून ह्यासाठी बीट मर्शलच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यात आली आहे,प्रत्येक दोन तासानंतर नियंत्रण कक्ष अंतर्गत क्यूआर कोड ची चेकिंग केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितलं,नाशिक शहरात 135 स्लम एरिया असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटना मध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलांचा सहभाग आढळून येत असल्याचं सांगत विश्वास नांगरे पाटील यांनी ह्यबाबत चिंता व्यक्त केली.
मात्र असं असलं तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांन सोबत नागरिकांनी देखील जागृत राहण्याची गरज आहे..
बाईट विश्वास नांगरे पाटील पोलीस आयुक्त नाशिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.