ETV Bharat / state

नारायण राणेंना अटक होणार? नाशिक पोलीस आयुक्तांचे अटकेचे आदेश, पथक कोकणात दाखल - नारायण राणे लेटेस्ट न्यूज

नारायण राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांची टीम कोकणात चिपळूनमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे राणेंना अटक होणार का? याकडे लक्ष लागले आहे. कारण, राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात खालच्या थराची आक्षेपार्ह टीका केली आहे.

rane
rane
author img

By

Published : Aug 24, 2021, 9:34 AM IST

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक कोकणात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन राणेंनी अपशब्द बोलले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रारर दिली. यानंतर गुन्हा दाखल नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार हे पथक कोकणात दाखल झाले आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या मुंबईतील जुहूतील निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नाशिक शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर

नारायण राणेंना अटक होणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे नारायण राणे यांना महागात पडत आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नारायण राणेंविरोधात नाशिकच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीनंतर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आल्याचे समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांची टीम राणे यांनां अटक करण्यासाठी कोकणात दाखल झाल्याचे समजत आहे. दरम्यान, जनआशिर्वाद यात्रेनिमित्त नारायण राणे आज (24 ऑगस्ट) चिपळूनमध्ये आहेत. येथे नाशिक पोलिसांची टीम पोहोचल्यानंतर त्यांना अटक करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे नारायण राणेंना आज अटक होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

या कायद्या अंतर्गत राणेंवर गुन्हा दाखल

नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. तर, पुणे, महाड, औरंगाबाद येथेही राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

मंत्रालयातील स्वातंत्र्यदिनाचा दाखला देत 'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. पाहा व्हिडिओ

हेही वाचा - 'नारायण राणे "कोंबडी चोर"', शिवसैनिकांची टीका, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.