ETV Bharat / state

नाशकात एटीएम चोरीचा सिनेस्टाईल थरार; दोघांना अटक - नाशिक पोलीस बातमी

मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एटीएम चोरीच्या धाडसी घटना घडत आहेत. मंगळवारी पुन्हा असाच एक एटीएम चोरीचा थरार नाशिकमध्ये घडला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने चोरांचा पाठलाग करत अटक केली.

विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:54 PM IST

नाशिक - एटीएम चोरी करणाऱ्या चोरांचा गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत अटक केली. नाशिक शहरातील सातपूर परिसरात ही घटना घडली. नाशिक पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने चोरांचा पाठलाग करत अटक केली

मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एटीएम चोरीच्या धाडसी घटना घडत आहेत. मंगळवारी पुन्हा असाच एक एटीएम चोरीचा थरार नाशिकमध्ये घडला. सातपूरच्या पपया नर्सरी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सहा जणांच्या टोळीने यशस्वीपणे उचलेले. मात्र, हे एटीएम मशीन वाहनात टाकत असताना गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर चोरांनी एटीएम सोडून पळ काढला.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार?

पहाटेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर नाशिक शहर पोलिसांच्या 5 ते 6 पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शहरात नाका बंदी केली. त्यामुळे चोरांना शहरातून पळ काढण्यात अपयश आले. हा चोर-पोलिसांचा खेळ शहरात 3 ते 4 तास सुरू होता. अखेर सिनेस्टाईल पद्धतीने पोलिसांनी एटीएम चोरांना पकडले. पकडलेल्या आरोपींच्या चौकशीनंतर त्यांच्याकडून पालघर आणि मोखाडा परिसरातील दरोड्याच्या घटनेची देखील उकल झाली. दरम्यान, चोरीच्या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

Intro:नाशिकच्या सातपुर परिसरात ATM चोरिची घटना समोर आलीय मात्र गस्तिवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने ATM चोरांचा हा डाव सिनेस्टाइल पद्धतीने पाठलाग करत हानून पाडला.नाशिक पोलिसांच्या या कार्रवाईच सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे.Body:गेल्या काही वर्षात नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ATM चोरिच्या धाड़सी घटना घडत आहे.आज देखील पुन्हा अशाच एका ATM चोरिचा थरार नाशिक मध्ये घड़लाय.सातपुरच्या पपया नर्सरी परिसरात असलेल्या ICIC बैंकेचे ATM सहा जनांच्या टोळीने यशस्वी रित्या फोडले होते.मात्र हे ATM मशीन वाहनात टाकता असतांना गस्तिवर असलेल्या पोलिस पथकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या चोरांना हटकल.त्यानंतर चोरांनी हे ATM मशीन सोडून पळ काढला मात्र त्या नंतर शहर पोलिसांनी शहर परिसरात नाकाबंदी करत या चोरीच्या घटनेतील 2 आरोपीतांना मोठ्या शिताफिने अटक केलीय.विशेष म्हणजे या अरोपीतांच्या चौकशी नंतर त्यांचे कडून पालघर आणि मोखाडा परिसरात टाकलेल्या दरोंड्याच्या घटनेची देखील उकल झालीय.

(या चोरिच्या घटनेचा संपूर्ण थरार CCTV कैमेरयात कैद झाला आहे)

बाईट - विश्वास नागरे पाटिल -
पोलिस आयुक्त
Conclusion:पहाटे च्या दरम्यान घड़लेल्या या घटने नंतर नाशिक शहर पोलिसांच्या तब्बल 5 ते 6 पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यानीं शहर भर नाका बंदी केल्याने या चोरांना शहरातुन पळन्यात अपयश आल. विशेष म्हणजे हा चोरी पोलिसांचा खेळ शहरात तब्बल 3 ते 4 तास सुरु होता.अखेर स्नेस्टाइल पद्धतीने पोलिसांनी या ATM चोरांच्या पंचवटी हद्दित मुसक्या आवळल्या.यात 2 आरोपी अटक करण्यात आले असून 4 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.