नाशिक : चैनीचे राहणीमान अनेकांना आवडते. पण या राहणीमानाच्या आकर्षणापोटी हरियाणाच्या दोन तरुणांनी रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्या हत्येच्या कारणाने एकच खळबळ उडाली आहे.
रोहिणी इंडस्ट्रीजचे सीईओ योगेश मोगरे हे गुरुवारी आपले काम आटोपून संध्याकाळी नेहमीप्रमाणे घराकडे जात होते. ते पांडवलेणी येथील एका टपरीवर थांबले होते. तेथेच हरियाणातील दोघांनी चाकूने हल्ला केला. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या मोगरे यांचा मृत्यू झाला. कोणताही पुरावा नसल्याने पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांना वाडीवरे शिवारात मोगरे यांची कार मिळून आली. पान टपरी चालकांनी मोगरेंना वाचवताना हल्लेखोरांवर दगड फेकले होते. ते कारला लागून कारच्या काचा फुटल्या होत्या. कारमध्ये पोलिसांना मोगरेंचा मोबाईल, पाकीट आणि रक्ताने माखलेले टी-शर्ट मिळून आले होते.
असा रचला कट- तिघे मित्र हरियाणावरून मुंबईला फिरण्यासाठी आले होते. मुंबई बघितल्यावर त्यांना लाईफस्टाईल आवडली. पैसा मिळविण्यासाठी त्यांनी थेट कार लुटण्याचा प्लॅन बनविला. तिघांपैकी एक जण रेल्वेने हरियाणातील गावी परत गेला. मात्र दोघांनी काहीतरी करू, या इराद्याने नाशिक गाठले. प्रवासात एखादी अलिशान कार लुटायची असा त्यांनी कट रचत पांडवलेण येथे दोघेही उतरले. रस्त्यातील कारची रेकी करू लागले. येथे असलेल्या एक पान टपरीवर अंबड एमआयडीसीतील रोहिणी इंडस्ट्रीज या कंपनीचे सीईओ योगेश मोगरे सिगरेटओढण्यासाठी थांबले होते. या दोघांनीही त्याच टपरीवरून सिगरेट घेऊन ओढली. उद्योजक मोगरे पुन्हा कारकडे जात असताना दोघांनी त्यांच्या हातातील चावी ओढण्याचा प्रयत्न केला. उद्योजक मोगरे यांनी आरडाओरडत करत प्रतिकार केला. दोघा तरुणांनी त्यांच्यावर चाकूने 25 ते 30 वार केले. मोगरे खाली कोसळल्यानंतर ते दोघेही कार घेऊन मुंबईच्या दिशेने पळून गेले. त्यांनी पुढे वाडीवरे शिवारात कार सोडून जंगलात रात्र काढली. ते कसाबसा प्रवास करून हरियाणा गावी पोहोचले.
मोबाईल नंबरवरून सुगावा - आरोपींचा माग काढला जात असताना पोलिसांना घटनास्थळावर एक मॉलची पिशवी सापडली. त्यात काही कपडे आणि एका कागदावर एक मोबाईल नंबर लिहिलेला सापडला. त्यावरून पोलिसांना तपासासाठी मोठे धागेदोरे मिळाले. त्याआधारे पोलिसांनी मुंबईपर्यंत माग काढला संशयित हे हरियाणाचे असल्याचे निकषापर्यंत ते पोहोचले. मिळालेल्या मोबाईल नंबरचा आधार घेत पोलीस पथकाने हरियाणातील ते गाववाटे आणि तिथून एक अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खात्या दाखविला. त्याने कार लुटण्याच्या इराद्याने हल्ला केल्याची पोलिसांना कबुली दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, गुलाब सोनार, ज्ञानेश्वर मोहिते, स्वप्निल जुंद्रे, प्रदीप ठाकरे, राहुल पालखेडे, पंकज करवाळा यांनी ही कामगिरी बजावली. आरोपीचा साथीदार अजित सिंग लाटवाल अद्याप फरार आहे. तो कुठे असावा याचीही माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्याच्या मागावर दोन पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा Chhatrapati Sambhaji Nagar Riots: छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीत 51 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू