ETV Bharat / state

Chain Snatcher Arrested: प्रेयसीचे महागडे हट्ट पुरवण्यासाठी प्रियकर बनला सोनसाखळी चोर...

Chain Snatcher Arrested : चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला नाशिक पोलीसांनी मंगळवारी जेरबंद केलं (Chain Snatching Accused Arrested) आहे. त्यांच्याकडून 11 लाख रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले (Nashik Police Arrested Accused) आहे.

Chain Snatcher Arrested
पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 10:30 PM IST

नाशिक Chain Snatcher Arrested: प्रियकर हा विवाहित असून सुद्धा बाहेर असलेल्या प्रियसीचे हट्ट पुरवण्यासाठी तो थेट महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी ओरबडून मौजमजा करत होता. एवढेच काहीतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईचेही मंगळसूत्र त्यांनेच लंपास केलं होतं. गंगापूर पोलिसांसह क्राईम ब्रॅंचला तो पुण्यात सापडला. त्याच्याकडून 11 लाख रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. शिवाय पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या (Nashik Police Arrested Accused) ठोकल्या आहेत.

एकूण 13 चैन स्नाचिंग : नाशिकच्या सातपूर संतोषीमाता नगर येथील सचिन पगार (वय 31) याच दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्याला एक मुलगा आहे, मात्र सातपूर येथील एका मुलीचे त्याचे प्रेम संबंध होते. प्लंबिंगचे काम करत असताना या प्रियसीचे लाड पुरवणे कठीण होत असल्यानं त्यांचे मित्र निलेश शिरसाठ आणि आकाश खैरनार यांच्यासह शहरात तब्बल 13 चॅन स्नाचिंग केल्याचं चौकशीत उघड झालं आहे. त्यापैकी एका घटनेत तैलवात यांना चाकूचा धाक दाखवतही त्यांनी सोनसाखळी लंपास केली होती.

असा लागला तपास : या गुन्ह्याचा तपास करतांना घटनास्थळी सीसीटीव्ही मध्ये दोघे संशयित कैद झाले होते. त्यातून सराईत गुन्हेगार सचिन पगारचे नाव पुढे आलं. त्याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. त्याने निलेश शिरसाठ,आकाश खैरनार यांच्यासह चोरी केल्याची कबूली दिली.सचिन पगार हा सोनसाखळ्या सातपूर येथील त्याचा भाऊ निरंजन पगार याच्याकडे विक्री करण्यास देत होता. तर निरंजन हा पुढे माल मुकुंद माने याला विकत असल्यानं पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं.

प्रियसीचे हट्ट पुरवण्यासाठी : सचिन पगारची चौकशी केली असता त्याने प्रियसीवर पैसे उडवल्याची कबुली दिली. त्याने तिला महागडा मोबाईल, कपडे भेट दिले. तसेच मुंबई, पुणे येथे मौजमजा केल्याचं तपासात उघड झालं आहे. या टोळीकडून 11 लाख 5 हजारांचा मुद्दे मला जप्त करण्यात आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime : दोन चेन स्नॅचरला सापळा रचून अटक
  2. Chain Snatcher Arrested: उच्चशिक्षित चोरटे करायचे 'चेन स्नॅचिंग'; जळगावातील सराफाला विकायचे माल.. आरोपी अटकेत
  3. Hyderabad Crime : दोन तासात सहा ठिकाणी चेन स्नॅचिंग; दिल्लीतील आंतरराज्य टोळीशी संबंध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.