नाशिक - जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मात्र नाशिककरांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. नाशिक पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मोहीम हाती घेतली असून गेल्या सहा महिन्यात विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या 19 हजार जणांवर कलम 188 अंतर्गत कारवाई केली.
नाशकात विना मास्क फिरणाऱ्या 19 हजार जणांवर पोलिसांची कारवाई नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज हजारोच्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल देखील कोरोनाबाधित रुग्णांनी भरून गेली आहे. अशात दुसरीकडे नाशिककरांची बेफिकीरी दिसून येत असून सर्रास सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. अनलॉक नंतर कोरोना गेला या आविर्भावात नागरिक बिनधास्त विना मास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहे. नाशिकच्या बाजारपेठेत सुद्धा कुठल्याही प्रकारांच्या सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसून येत नाही. अशात नाशिक पोलिसांनी देखील विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. मागील सहा महिण्यात पोलिसांनी 19 हजार 728 जणांवर भारतीय दंड विधान 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. ही कारवाई यापुढे अधिक मोठ्या प्रमाणत केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं आहे.
नाशकात विना मास्क फिरणाऱ्या 19 हजार जणांवर पोलिसांची कारवाई सोशल डिस्टनसिंगचे पालन आणि विना मास्क फिरणाऱ्याव कठोर कारवाई - छगन भुजबळ
नाशिकमध्ये नागरिक कुठल्याचं प्रकराचं सोशल डिस्टनसिंग आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करत नाही. याबाबत कोरोना आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत सोशल डिस्टनसिंगचे पालन आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या दुकानात सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नाही, अशा दुकानांना पहिल्यांदा सूचना देण्यात याव्या. मात्र, तरी सुद्धा परिस्थिती सुधारली नाही तर दुकाने बंद करण्याची कारवाई करावी करण्यात यावी, असे ही भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.