नाशिक - विधानसभा निवडणुका आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी ९० पेक्षा अधिक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तसेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अकराशे जणांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती नाशिकचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
हेही वाचा - सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी केले गजाआड
काही दिवासांवर येवून ठेपलेल्या नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विधानसभा निवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी हा उपाय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचा वापर होतो. त्यामुळे निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच निवडणूक सुरळीत व्हावी म्हणून ही कारवाई करत असल्याचे नांगरे-पाटील म्हणाले.