ETV Bharat / state

नाशिक : विकेंड लॉकडाऊनमध्ये विवाहसोहळ्याला परवानगी - छगन भुजबळ लेटेस्ट न्यूज नाशिक

तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध नाशिक जिल्ह्यात कायम राहणार असले, तरी शनिवार व रविवारी विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्न कार्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यानी सांगितले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद
छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Jun 12, 2021, 5:42 PM IST

नाशिक - तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध नाशिक जिल्ह्यात कायम राहणार असले, तरी शनिवार व रविवारी विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्न कार्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यानी सांगितले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पाडता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

शनिवार व रविवारी विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्न कार्यास परवानगी देण्यात आली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत अटीशर्तीसह ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी रितसर पोलीस परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. मात्र नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी भुजबळ यांनी दिला आहे. दरम्यान लग्नसोहळ्यासाठी निर्बंध शिथील केल्याने मंगल कार्यालय व लाॅन्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बहुतांश लग्नाच्या तिथी या विकेंडला

लग्नाच्या बहुतांश तिथी या विकेंडला आहेत. त्यामुळे मंगल कार्यालय व लाॅन्स मालकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन विकेंड लाॅकडाऊनमध्ये लग्नसोहळ्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी शनिवार व रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत ५० लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळ्याला परवानगी दिली.

छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद

...म्हणून नाशिकला तिसऱ्या टप्प्यातच ठेवण्यात आले - भुजबळ

कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपर्यत खाली उतरला असला, तरी ऑक्सिजन बेडवर उपचार घेणार्‍यांची संख्य‍ा व वाढता मृत्यूदर बघता नाशिक जिल्ह्याला तिसर्‍या टप्प्यातच ठेवण्यात आले आहे. यापूर्वी लागू केलेले निर्बंध अटीशर्तीसह यापुढे देखील कायम राहतील. पुढील आठवड्यात पुन्हा आढावा घेऊन, निर्यण घेतला जाईल असेही यावेळी भुजबळ म्हणाले.

सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट - भुजबळ

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येत मोठी सुधारणा झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 5 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर हा सरासरी १.८१ टक्के इतका आहे. म्यूकरमायकोसिसचे जिल्ह्यात ५३५ रुग्ण असून, त्यापैकी २०६ रुग्ण बरे झाले आहे. तर ५४ जणांचा मृत्यू झाला असल्याचीही माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

वारीबाबत सर्वांनाच प्रेम - भुजबळ

पंढरपूर वारीवरून सुरु असलेल्या राजकारणाबाबत विचारले असता, राज्यातील मंत्र्यांचे बापजादे वारकरीच होते. वारीवर प्रेम आहेच, पण गर्दी झाली तर कोरोनाला रोखणं अवघड होईल. मंत्रिमंडळाने एकमुखी निर्णय घेतला असून, बसमधूनच वारीला परवानगी देण्यात आली आहे.
ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना कोण सांगणार असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपाला लगावला आहे.

हेही वाचा -कोरोना माता मंदिर...!!! मास्क लावून झाली स्थापना, दररोज केली जाते पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.