नाशिक - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडला आहे. पहिल्यांदाच महिला अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. विविध क्षेत्रातून या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया येत आहेत. परंतु, नाशिककरांच्या या अर्थसंकल्पाबाबच्या आशा फोल ठरल्या आहेत.
या अर्थसंकल्पात कामगार आणि शेतकरी वर्गाच्या आशा फोल ठरल्या आहेत. फसव्या पेन्शन योजना राबवण्याचं सरकारचं म्हणणं असून ज्या व्यापाऱ्यांनी कधी पेन्शनची मागणी केली नाही त्यांना पेन्शन दिली जात आहे. बहुमताने निवडून आलेल्या सरकारने देशातील शेतकरी, कामगार आणि सामान्यांचा विचार केलेला नाही. रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काहीही दिसत नसून अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मत शेतकरी नेते राजु देसले यांनी व्यक्त केलं आहे.
मध्यमवर्गीयांना कोणतीही कर सवलत दिलेली नाही. मात्र, महिला व ग्रामीण भागाच्या विकासासंदर्भात करण्यात आलेल्या घोषणा या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य असल्याचं अर्थतज्ञ विश्वनाथ बोंडे यांनी म्हटलं आहे.