ETV Bharat / state

नाशिक येथील कबड्डी-प्रो स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट क्लब विजयी - शिवशक्ती स्पोर्ट क्लब आडगाव

पुणेरी पलटण आणि नाशिक कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कबड्डी प्रो स्पर्धेताल अंतिम फेरीमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात नाशिकच्याच शिवशक्ती स्पोर्ट क्लब आडगाव या संघाने बाजी मारली आहे.

नाशिकमध्ये कबड्डी प्रो स्पर्धा
author img

By

Published : Aug 26, 2019, 11:33 AM IST

नाशिक - पुणेरी पलटण आणि नाशिक कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये झालेल्या कबड्डी प्रो स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट क्लब हा संघ विजयी ठरला आहे. अंतिम सामन्यामध्ये नाशिकच्याच शिवशक्ती स्पोर्ट क्लब आडगाव संघाने ब्रम्हा स्पोर्ट्स संघावर १८ विरुद्ध १६ अशी मात करत विजेतेपद पटकावले.

नाशिक येथील कबड्डी-प्रो स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट क्लब विजयी

IND VS WI: भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी

या कबड्डी स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 288 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्यावत साधने व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकमध्ये हे कबड्डी सामने सुरू केले असल्याचे क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांनी सांगितले आहे.

पी. व्ही. सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी, जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय

या स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गिरीष पालवे यांच्या हस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, अविनाश खैरनार, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन, तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होते.

कलम ३७० च्या निर्णयामुळे रिअल काश्मीरचे खेळाडू संकटात

Intro:पुणेरी पलटण आणि नाशिक कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या कबड्डी प्रो स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये झालेल्या अटितटिच्या लढाईत नाशिकच्या शिवशक्ती स्पोट क्लब आडगाव या संघाने ब्रम्हा स्पोर्ट्स वर १८ विरुद्ध १६ अशी दोन गुणी मात करत विजेतेपद पटकावले.Body:या कबड्डी स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदविला असून एकूण 288 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्यावत साधने व योग्य मार्गदर्शन मिळावे याकरता नाशिक मध्ये दोन मँट वर हे कबड्डी सामने सुरू असल्याचं क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांनी सांगितलं

बाईट:-क्रीडाशिक्षक प्रशांत भाबडConclusion:या स्पर्धेचे कामकाज 24 प्रशिक्षक व 14 संघ व्यवस्थापक यांनी बघितलं असुन ग्रामीण भागातील खेळाडूंना अशा स्पर्धामुळे प्रोत्साहन मिळणार आहे
स्पर्धेचे उद्घाटन नाशिक शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गिरीष पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्येक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड,अविनाश खैरनार, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन,तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होते.स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात क्रीडाप्रबोधनी नाशिकचने समाजश्री प्रशांत दादा हिरे क्रीडा मंडळाचा ४२ विरुद्ध १७ असा २५ गुणांनी पराभव केला.दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत शिवशक्ती अडगावने साई स्पोर्ट्स सिडकोचा ३० विरुद्ध१८ असा पराभव केला दुसऱ्या सामन्यात शिखरेवडी क्रीडा मंडळाने जय हनुमान पांडुरलीचा अटीतटीच्या सामन्यात१८ विरुद्ध १६ असा अवघ्या २ गुणाने पराभव केला तर ब्रह्मा स्पोर्ट्स अडगाव व रुद्रा ब्राह्माणवाडे क्रीडा मंडळ यांच्या शेवटच्या क्षणा पर्यंत रंगलेल्या संघर्ष पूर्ण लढतीत ब्रम्हा स्पोर्ट्स अडगावणे ३५ विरुध्द ३४ असा १ गुणाने पराभव करून उपांत्यफेरी गाठली.
स्पर्धा यशस्वीतेसाठी विलास पाटील,शरद पाटील,राकेश खैरनार यांनी प्रयत्न केले तर पंच म्हणून डॉ दत्ता शिंपी, राजेंद्र निकुंभ, जॉर्ज स्वामी, रहेमान शेख,महेंद्र वानखेडे, चंद्रकांत ढिकले,विजय ढिकले,रवी खैरे, दत्ता जाधव पुष्पा चौधरी यांनी काम पाहिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.