नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं मोबाईल क्रमांकावर हेल्पलाइन सुरू केली आहे. या सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
नाशिक शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याचाचं एक भाग म्हणून अत्याधुनिक आयव्हीआर व बल्क एसएमएस प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यासाठी 9821188189 या मोबाईल क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइन नंबरद्वारे शहरातील नागरीक मनपाच्या वैद्यकीय अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. तसेच शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचा आरोग्य सर्व्हे करण्यात येत आहे. त्यासाठी बल्क एसएमएस प्रणालीद्वारे नागरिकांना covid19.nmc.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लिंक उघडल्यानंतर त्यात सर्व्हे फॉर्म दिसेल, त्यात नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरायची आहे.
![Nashik Municipa](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-nsk-coronamobilehelplineservice-7204957_12042020201544_1204f_1586702744_396.jpg)
माहितीच्या आधारे कोरोनासदृश्य आजार असलेल्या नागरिकांपर्यंत महानगरपालिकेला पोहोचता येईल. तसेच त्यावर तातडीने पुढील उपचार वैद्यकीय मदत उपलब्ध करून देता येईल. या सर्व्हेच्या माहितीद्वारे महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणू रोगाची साखळी तोडण्यास बहुमूल्य मदत होणार आहे असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
आयव्हीआर प्रणालीचे वैशिष्ट्ये-
-24×7 सेवा उपलब्ध.
-नागरीकांना हेल्पलाईन वर तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध..
-आपल्या जवळचे तपासणी केंद्र व रुग्णालय शोधू शकता.
-सुरक्षा,घरातच राहणे व सामजिक दुरी यासंदर्भात दिनदर्शिका मिळून शकता..
-covid -19 संदर्भात महत्वाचे दिनदर्शिका आणि ताजी माहिती मिळु शकता..