नाशिक- एलबीटीचा ताळमेळ न देणारे व्यापारी आता नाशिक महापालिकेच्या रडारवर आले आहेत. एलबीटी कर प्रणाली रद्द होऊन पाच वर्षे उलटल्यानंतरही 25 हजार व्यापाऱ्यांनी विवरण पत्राच्या अनुषंगाने नेमकी खरेदी- विक्रीचे पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे या व्यापाऱ्यांची बँक खाती गोठवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
प्रतिसाद न दिल्यास कारवाई
६५ हजार विवरणपत्रापैकी जवळपास ४० हजार प्रकरणात एलबीटीचा ताळमेळ जुळला आहे. मात्र, अद्याप २५ हजार खात्यांमधील विवरणपत्राचा ताळमेळ जुळलेला नाही. अशा सर्व खातेधारक व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या असून यानंतरही जे प्रतिसाद देत नाहीत अशा व्यापाऱ्यांच्या बँक खाती गोठवली जाणार असल्याचे म.न.पा.उपायुक्त प्रदीप चौधरी यानी सांगितले आहे.