ETV Bharat / state

Nashik Corporation : नाशिक महापालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर; 'अशी' असेल रचना - नाशिक मनपा प्रभाग आराखडा

नाशिक महानगरपालिकेची बहुचर्चित नवी प्रभाग ( Ward Formation In Nashik Munciple Corporation ) रचना अखेर जाहीर झाली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक याच नव्या प्रभाग रचनेनुसार ( Nashik Corporation Election By New Ward System ) होणार आहे.

Nashik
Nashik
author img

By

Published : Feb 1, 2022, 4:15 PM IST

नाशिक - महानगरपालिकेची बहुचर्चित नवी प्रभाग ( Ward Formation In Nashik Munciple Corporation ) रचना अखेर जाहीर झाली आहे. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक याच नव्या प्रभाग रचनेनुसार ( Nashik Corporation Election By New Ward System ) होणार आहे. त्यामुळे नाशिककरांसह राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक या साऱ्यांचे लक्ष या प्रभाग रचनेकडे लागले होते, तर काही इच्छुकांनी याठिकाणी सकाळपासूनच गर्दी केल्याचे दिसले. एक प्रकारे महापालिका निवडणूक प्रक्रियेलाच सुरुवात झाली आहे. संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेल्या चार सदस्यांचा प्रभाग हा पंचवटी विभागामध्ये आला आहे.

अशी असेल प्रभाग रचना -

आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयात मनपा प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी ही प्रभागरचना जाहीर केली. या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा नाशिक महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालांच्या ठिकाणी ( सातपूर, पंचवटी, नाशिक पश्चिम, नाशिकरोड, सिडको, नाशिकपूर्व ) उपलब्ध झाला आहे. तसेच, नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवरही हा आराखडा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी प्रथमत आराखडा प्रसिद्ध झाल्याने त्याची मोठी उत्सुकता सर्वांमध्ये आहे. प्रभागनिहाय नकाशे, त्यात समाविष्ट होणारा परिसर हे सर्व आराखड्यात नमूद करण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेत विद्यमान १२२ नगरसेवक आहेत. मात्र, राज्य सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार आता नाशिक महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ही संख्या आता १३३ होणार आहे. गेल्या निवडणुकीत ४ नगरसेवकांचा एक प्रभाग करण्यात आला. मात्र,

हरकत घेण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत -

राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता त्रिसदस्यीय प्रभाग असणार आहे. त्यामुळे नाशिक शहरात ३ नगरसेवक असलेले ४३ प्रभाग असतील तर १ प्रभाग हा ४ नगरसेवकांचा राहणार आहे. प्रभाग रचनेवर हरकत घेण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असून दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरूपात हरकत नोंदवली लागणार आहे. त्यानंतर आयोगाने दिलेल्या आदेशानुसार त्यावरती सुनावणीदेखील घेतली जाणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Student Agitation : 'विद्यार्थ्यांचे आंदोलन हे सरकारच्या काही विभागांचे अपयश'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.