नाशिक - कोरोना बाबतच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर आता शासनाकडून कारवाई करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील हॉटेल ज्युपिटर येथे लग्न समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या लग्न संमारंभात कोरोना नियमांना पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. याबाबातची माहिती महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या संबंधित हॉटेलवर कारवाई केली आहे.
वऱ्हाड्यांची झाली धावपळ
नाशिक शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आता नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशीच एक कारवाई नवीन नाशिक भागातील हॉटेल ज्युपिटर याठिकाणी प्रशासनाने केली आहे. ज्युपिटर हॉटेलमध्ये आयोजित लग्न समारंभामध्ये सोशल डिस्टंसिंग आणि मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेल ज्युपिटरवर अचानकपणे धाड टाकली. या वेळी पोलिस आल्याची माहिती मिळताच वऱ्हाड्यांची धावपळ झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा-वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर, वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक