नाशिक : Nashik Mobile Blast : आपल्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारासोबत मोबाईल देखील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळं आपण अगदी सर्वठिकाणी मोबाईल आपल्यासोबतच ठेवतो. अगदी झोपताना देखील मोबाईल जवळ चार्जिंगला लावून झोपतो. मात्र, असं करणं धोकादायक आहे, असा इशारा वारंवार देण्यात येतो. त्यातच आता मोबाईलचा भीषण स्फोट झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सिडको भागातील उत्तमनगर परिसरात एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलच्या भीषण स्फोट झाला.
मोबाईलचा भीषण स्फोट : याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील उत्तमनगर परिसरात आज (27 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट झाला. या घटनेत घरातील तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप जखमी झाले आहेत. तर यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की, घराचं मोठं नुकसान झालंय. तसेच आजूबाजूच्या घरांच्याही काचा फुटल्या आहेत.
मोबाईल चार्जिंग करताना घ्यावी काळजी : स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलचा भरपूर वापर करतात. मोबाईल चार्जिंग करताना काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र, अनेकदा मोबाईलची बॅटरी कमी झाल्यानंतर आपण सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करतो. मात्र, असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकतं, तुमची महत्वाची माहिती चोरीला जाऊ शकते. यालाच ज्यूस जॅकिंग असं म्हटलं जातं.
ज्यूस जॅकिंग म्हणजे नेमकं काय? : याबद्दल सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे. मोबाईल हा आपल्या जीवनातला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. खास करून ट्रॅव्हल करताना आपल्या मोबाईलची बॅटरी खूप लवकर डिस्चार्ज होते. एअरपोर्टवरती, कॅफेमध्ये किंवा रेल्वे स्टेशनवर यूएसबी चार्जिंग पोर्ट दिलेला असतो. अशा पोर्टला मोबाईल चार्जिंग लावणं धोकादायक ठरू शकतं. अशा पद्धतीला ज्यूस जॅकिंग असे म्हणतात.
हेही वाचा -
- Bus Accident : पुणे-नागपूर महामार्गावर खासगी बस पुलावरुन कोसळली; 25 प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर
- Explosion In Electric Scooter : घरासमोर उभ्या केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटीचा भीषण स्फोट, पाहा थरारक व्हिडिओ
- Rajasthan Road Accident : भाविकांच्या बसला ट्रेलरची भीषण धडक, अपघातात 12 भाविक ठार तर 11 जण जखमी