ETV Bharat / state

विधानसभेसाठी मनसेची राज्यभर चाचपणी; नाशिकचा गड पुन्हा मिळवण्यासाठी कसली कंबर

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता आघाडीसोबत मनसे युती करणार की, एकला चलोचा नारा देते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मनसे
author img

By

Published : Aug 26, 2019, 5:25 PM IST

नाशिक - राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील यामध्ये मागे नाही. मनसेनेकडून सुद्धा आता विभानिहाय बैठका घेऊन उमेदवारांबाबत चाचपणी केली आहे.

विधानसभेसाठी मनसेची राज्यभर चाचपणी

नाशिकमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली. यावेळी राज्यात मनसे विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड म्हणून ओळखला जात होता. नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार होते. महापालिकाही मनसेच्या ताब्यात होती. मात्र, २०१४ नंतर नाशिकमध्ये मनसेचे वर्चस्व कमी-कमी होत गेले. शहरात फक्त आता चारच मनसेचे नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता आघाडीसोबत मनसे युती करणार की, एकला चलोचा नारा देते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Intro:राज्यातील विधानसभा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्यानं सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील यामध्ये माघे नाही. मनसेने देखील आता विभानिहाय बैठक घेत उमेदवारांच्या बाबत चाचपणी केली आहे. Body:नाशिकमध्ये देखील मनसे नेते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली. यावेळी राज्यात मनसे विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेय. एकेकाळी नाशिक हा मनसे गड म्हणून ओळखला जात होता. नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार होते पालिकाही मनसेच्या ताब्यात होती

बाईट :- संदीप देशपांडे
Conclusion:मात्र २०१४ नंतर नाशिकमध्ये मनसेचे वर्चस्व कमी कमी होत गेले. शहरात फक्त आता चारच मनसेचे नगरसेवक आहेत. त्यात मनसेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपला गड राखण्यासाठी कंबर कसलीय. त्यातच आता आघाडीसोबत मनसे युती करणार का याशिवाय मनसे एकला चलो चा नारा देते याकडे आता राज्याचे लक्ष लागलंय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.