नाशिक: वेगवेगळ्या युवतींवर अवघ्या आठ तासांत मेकअप करण्याचा सौंदर्यप्रसाधनातील विक्रम नाशिक येथील भाग्यश्री धर्माधिकारी यांनी केला आहे. भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सलग आठ तासांत 64 युवतींचा मेकअप करून एक नवा विक्रम केला आहे. लवकरच याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. याआधी गुजरातच्या नवसारी येथील पूजा देसाई यांनी सलग आठ तासांत 56 मुलींचा मेकअप केला होता. हा रेकॉर्ड आता नाशिकच्या भाग्यश्री यांनी मोडीत काढला आहे .
कोण आहेत भाग्यश्री धर्माधिकारी?: भाग्यश्री धर्माधिकारी यांनी केलेल्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे, असल्याचे आयोजकांनी सांगितले. भाग्यश्री धर्माधिकारी या दहा वर्षांपासून नाशिकमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड चित्रपटांसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. कॉलेज काळापासूनच त्यांना सौंदर्यशास्त्राची आवड असल्याने त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले. तसेच त्या आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या संचालिका असून त्यांनी मेकअप, स्कीन, हेअर तसेच सेमी-पर्मनंट मेकअप आदींचे हजारो मुला-मुलींना सौंदर्यशास्त्राचे प्रशिक्षण दिले आहेत. मुलींनी स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी त्या प्रयत्नशील आहे. त्यांचे पती आणि सासरे यांनी नोकरीचा राजीनामा देत ते भाग्यश्री धर्माधिकारी यांना त्यांच्या कामात मदत करत आहे.
विक्रमाची लवकरच नोंद होणार: आज दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता नाशिकच्या सेलिब्रेटा हॉटेलच्या सभागृहात मेकअप आर्टिस्ट भाग्यश्री धर्माधिकारी यांनी 64 वेगवेगळ्या युवतींचा मेकअप करत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. भागश्री यांनी आठ तासात तब्बल 64 युवतींचा मेकअप करून 55 मेकअप करण्याचा विक्रम मोडला. याची आवश्यक कागदपत्रे, व्हिडीओ शुटिंग तसेच पुरावे त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमकडे पाठवली आहेत.
आठ मिनिटात मेकअप: मी अनेक कार्यक्रमांमध्ये जाताना पार्लरमध्ये मेकअप करत असते. मेकअप करायला अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. भाग्यश्री धर्माधिकारी यांनी अवघ्या आठ मिनिटात माझ्या स्किन टोनला साजेशा मेकअप केला आणि हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. त्यांनी इतक्या कमी वेळात चांगला मेकअप केल्याने त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे एका युवतीने सांगितले.
विश्वविक्रम करणे मोठी गोष्ट: सलग आठ तास उभे राहून 60 हुन अधिक युवीतींचा स्किन टोन प्रमाणे मेकअप करणे अवघड गोष्ट आहे. 200 प्रकारच्या मेकअप किट मधून प्रत्येक मुलींना 15 ते 20 प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनाचा वापर करावा लागतो. रेकॉर्ड करण्यास साठी अनुभव, सातत्य आणि कष्ट ही लागत असल्याचे मेकअप आर्टिस्ट सांगितले.
चेहऱ्याची निगा कशी घ्याल?: प्रत्येक व्यक्तींच्या चेहऱ्याची त्वचा ही वेगळी असते. ड्राय, ऑईली आणि कॉम्बिनेशनमध्ये स्क्रीन असते. सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करून चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. टोनिग केले पाहिजे. कच्चे दूध क्लिनिंग साठी वापरू शकतो तसेच हळद, चंदन पावडर आणि दही यांचा फेस पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावला पाहिजे. तसेच महिन्यातून एकदा फेशियल केले पाहिजे. आहारात फळांचा वापर केला पाहिजे तसेच योगा आणि मेडिटेशनमुळे देखील चेहरा अधिक चांगला राहण्यास मदत मिळते.