ETV Bharat / state

नाशिकमध्ये गोडाऊन फोडून लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद - Rajasthan Liquor Company robbery

नाशिकच्या शिंदे पळसे परिसरातील राजस्थान लिकर लिमिटेड कंपनीचे मद्याचे गोडाऊन चोरट्यांनी मध्यरात्री फोडून तब्बल 27 लाख रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 370 दारूच्या बॉक्सची चोरी केली आहे. 3 चोरटे हे शटर तोडून ही चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

liquor stolen Rajasthan Liquor Company
राजस्थान लिकर कंपनी चोरी नाशिक
author img

By

Published : May 9, 2021, 5:15 PM IST

नाशिक - नाशिकच्या शिंदे पळसे परिसरातील राजस्थान लिकर लिमिटेड कंपनीचे मद्याचे गोडाऊन चोरट्यांनी मध्यरात्री फोडून तब्बल 27 लाख रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या 370 दारूच्या बॉक्सची चोरी केली आहे. 3 चोरटे हे शटर तोडून ही चोरी करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

चोरी होत असतानाचे दृश्य

हेही वाचा - रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करताना नाशिकमध्ये दोघांना अटक

शिंदे पळसे नायगाव रोडवर सर्व विदेशी दारू कंपनीचे गोडाऊन आहेत. नायगाव रोडवरील लोहिया कंपाऊंडमध्ये राजस्थान लिकर लिमिटेड कंपनीचे गोडाऊन असून त्या ठिकाणी विविध कंपनीची दारू मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवली जाते. काल रात्री दोन वाजेच्या सुमारास लोहिया कंपाऊंडमध्ये तीन चोरटे शिरले आणि त्यांनी
राज्यस्थान लिकर कंपनीच्या गोडाऊनच्या शटरचे दोन्ही कुलूप लोखंडी टॉमीने तोडून गोडाऊनमधील वेगवेगळ्या साईजचे 370 बॉक्समधील सुमारे 27 लाख रुपये किंमतीची दारू आयशर गाडीत भरून चोरून नेली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - मनमाडला लसीकरण वाढवण्याची नागरिकांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.