ETV Bharat / state

माझे कुटुंब माझे जबाबदारी’ मोहिमेत पोलिसांचा देखील समावेश करा - पालकमंत्री भुजबळ - माझे घर माझी जबाबदारी

माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा. प्रत्येक घरा घरात जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध व माहिती लपविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना नाशिकचे पालकमंत्री भूजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माझे कुटुंब माझे जबाबदारी
माझे कुटुंब माझे जबाबदारी
author img

By

Published : Sep 20, 2020, 7:13 AM IST

येवला (नाशिक)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठाकरे सरकारने 'माझे कुटुंब माझे जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले की, माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा. प्रत्येक घरा घरात जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध व
माहिती लपविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. कोमॉर्बीड रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी. सर्वेक्षणाचे काम थांबता कामा नये ते सातत्याने सुरू ठेवावे. खासगी डॉक्टरांशी समन्वय ठेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती दररोज संकलित करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोव्हिड सेंटर मध्ये रुपांतरित करावा, माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेत प्रशासनासोबत नागरिकांची देखील महत्वाची जबाबदारी आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्रधान्याने कोरोनाची चाचणी करण्यात यावी. यासाठी खासगी डॉक्टरांनाही सूचना देण्यात याव्यात. लोकांमधील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. लग्न व इतर समारंभासाठी नियमभंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगून भुजबळ यांनी मोठ्या गावांमध्ये कोव्हिड तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या. तसेच यावेळी शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. तसेच रुग्णवाढ लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात विभागणी करून कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना दिले.

यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनंत पवार, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,मनमाड पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.