नाशिक - संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षी पावसाने हाहाकार मजवलेला असताना या वर्षी द्राक्ष उत्पादकांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करत दिंडोरीतील द्राक्ष बांगलादेशला रवाना केली आहे. नाशिक जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर महिण्यापर्यंत पावसाने मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.
अशा परिस्थितीत पावसाच्या तावडीतून शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागा वाचवल्या होत्या. आता द्राक्षला बांगलादेशातील व्यापाऱ्यांनी पसंती दिली आहे, असे द्राक्ष उत्पादक संतोष लहानू कड यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिकमध्ये 'हा खेळ अक्षरांचा' या प्रदर्शनीचे आयोजन; मराठी शब्द संस्कृतीचे होत आहे दर्शन
यंदा द्राक्ष पिकावर दरवर्षीपेक्षा दुप्पटीने औषध व मेहनत करावी लागली आहे. आर्थिक खर्चाचे प्रमाणही वाढले आहे. अशातच नैसर्गिक संकटावर मात करुन शेतकऱ्यांनी बागा जपल्या आहेत. त्यामुळे यंदा जेवढा खर्च झाला आहे, तो जरी निघाला तरी समाधान आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.