ETV Bharat / state

Nashik Fire Brigade : अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया रखडली, नाशिककरांची सुरक्षा रामभरोसे - Nashik Fire Department

Nashik Fire Brigade : नाशिक महापालिकेची फायरमन संवर्गातील भरती प्रक्रिया सध्या रखडली आहे. त्यामुळं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक अग्निशामक दलामध्ये सध्या केवळ 90 अग्निशामक कर्मचारी कार्यरत आहेत. शहरात इमारतींची संख्या उंची वाढत असल्यानं त्यानुसार अग्निशमन जवानांची गरज भासणार आहे.

Nashik Fire Brigade
Nashik Fire Brigade
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 8:20 PM IST

नाशिक Nashik Fire Brigade : मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक शहराचा विस्तार झपाट्यानं होत आहे. सध्या नाशिकची लोकसंख्या 20 लाखांच्या आसपास आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम महापालिका करते. मात्र शहरातील अग्निशमन विभागाकडं केवळ 118 कर्मचारी आहेत. त्यामुळं नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मोठी आग लागल्यास कर्मचार्‍यांवर १२ तास किंवा त्याहून अधिक तास काम करण्याचा ताण येतो. अग्निशमन विभागात आणखी 299 पदे भरणे आवश्यक असताना ही भरती लालफितीत अडकली आहे.

अग्निशमन जवानाची गरज : नाशिक शहरात शिंगाडा तलाव, म्हसरूळ, नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी अशी सहा अग्निशमन केंद्रे आहेत. सध्या 60 फायरमन, 30 लँडिंग फायरमनसह 28 ड्रायव्हर कार्यरत आहेत. त्यांच्यावर संपूर्ण नाशिक शहराची सुरक्षा अवलंबून आहे. नाशिक महापालिकेच्या पहिल्या आराखड्यात फायरमन संवर्गातील 299 पदे मंजूर झाली आहेत. सेवानिवृत्ती तसंच स्वेच्छानिवृत्तीमुळे चालक सोडून केवळ 90 अग्निशमन कर्मचारी कार्यरत आहेत. 272 पदे रिक्त असून चालक, वायरलेस ऑपरेटर, ड्युटी फायर ऑफिसर, सब ऑफिसर, स्टेशन ऑफिसर आदी पदंही रिक्त आहेत. शहरात 12 मजल्यांपेक्षा उंच इमारती बांधण्यात येत असून त्यानुसार अग्निशमन दलाची अधिक गरज भासणार आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या समस्या : गेल्या 10 वर्षात नाशिकची लोकसंख्या वाढली. मात्र पण शासनानं अग्निशमन दलात कोणतीही भरती केली नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. सध्या 90 कर्मचारी, वाहन चालक 30 अशी कर्मचारी संख्या आहे. अशात पुढील वर्षी 20 ते 22 कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळं अजून कर्मचाऱ्यांचा ताण वाढणार आहे. 12 तासाहून अधिक काम करूनही अधिक मोबदला दिला जात नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.

लवकरच रिक्त पदे भरणार : अग्निशामक विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यासाठी लवकरच महानगरपालिका जाहिरात काढणार आहे. अधिकारी, कर्मचारी संख्या पुरेशी झाल्यानंतरच सर्वांचाच कामाचा ताण हलका होईल, असं मुख्य अग्निशमक अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितलं.

अग्निशमन वाहने देखील भंगारात : नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडं सद्यस्थितीत एकूण 33 वाहनं असून त्यात नऊ वाहनं स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. कारण त्या वाहनांना घेऊन पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. तसंच उंच इमारतीमध्ये आग लागली, तर करायचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. अग्निशामन दलाकडं 22 मीटर उंचीची शिडी आहे. त्याद्वारे 90 मीटर उंचीपर्यंत आग विझवली जाऊ शकते. म्हणजे साधारण नऊ ते दहा मजल्याच्या इमारतीवर आग लागल्यास ती विझवणे शक्य आहे. मात्र, यापेक्षाही जास्त मजल्याच्या इमारती नाशिक शहरात राहत आहेत. त्यामुळं भविष्यात यापेक्षाही जास्त उंचीच्या शिडीची गरज भासणार आहे.

हेही वाचा -

  1. Nashik Kumbh Mela Preparations : नाशिकमध्ये सिंहस्थपूर्व तयारीला सुरुवात, कुंभमेळ्याचा प्रारूप आराखडा 8 वरून 11 हजार कोटींवर
  2. Drought In Nashik District : विरोधक आक्रमक झाल्यानं सरकार नमलं: अखेर 'हे' तालुके दुष्काळसदृष्य जाहीर झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा
  3. Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिक पोलीस सतर्क; परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.