नाशिक : नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांना ( Conducted Raid and Seized Gutkha Worth Rs 2 Crore ) गुप्त सूत्रांच्या द्वारे माहिती मिळाल्यानंतर, दि. 29 रोजी वाडीवऱ्हे येथे जाऊन छापा ( Nashik Food and Drug Administration Department ) टाकला. त्यावेळी गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर ( Nashik FDA Department Conducted Raid ) आढळले. पथकाने सापळा रचून कारवाई सुरू केली. तेव्हा झाडाझडतीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळला.
कंटेनरमध्ये आढळला गुटख्याचा मोठा साठा कंटेनर ( नंबर - RJ 06 GB 5203) मधून एसएचके प्रिमिअममधून गुटख्याचा 1 काेटी 50 लाख 54 हजारांचा गुटखा, तर (RJ 09 GB 0472) या कंटेनरमधून एसएचके प्रिमिअम, सफर, फाेर के स्टार या नावाचा एकूण 45 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. दोन्ही कंटेनरमधून एकूण 1 काेटी 95 लाख 87 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे.
30 लाख रुपयांचे दोन कंटेनर जप्त तसेच कारवाईत अंदाजे 30 लाख रुपयांचे दोन कंटेनर अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले आहे. जप्त मुद्देमाल वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून संशयित चालक, मालवाहतूकदार, पुरवठाधारकांवर भांदवि कलमांसह अन्न सुरक्षा मानदे कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त उदय लोहकरे, मनिष सानप यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार व अमित रासकर यांनी केली.