ETV Bharat / state

बाप की राक्षस : मुलीच्या अंधत्वाचा फायदा घेत जन्मदात्याचाच अत्याचार

जन्मदात्या बापानेच आपल्या अंध मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.

जन्मदात्या बापाचा मुलीवर अत्याचार
author img

By

Published : Jul 26, 2019, 4:29 PM IST

Updated : Jul 26, 2019, 4:48 PM IST

नाशिक - मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.

जन्मदात्या बापानेच केला आपल्या अंध मुलीवर अत्याचार

अल्पवयीन पीडित मुलगी दृष्टिहीन असून ती एका आश्रमशाळेत शिकत आहे. आश्रम शाळेच्या नियमानुसार दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. याच वैद्यकीय तपासणीत ही तरुणी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी संबंधित शिक्षकांनी या पिडीत मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची माहिती शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकांनी याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित शिक्षकांनी पीडितेला मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात घेऊन जात तिथे फिर्याद दाखल केली. परंतु, हा प्रकार ओझर पोलीस ठाण्याच्या अखत्यारित घडल्यामुळे मालेगाव कॅम्प पोलिसांनी हा गुन्हा ओझर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. आपल्या विरूध्द फिर्याद दाखल झाल्याचे समजताच हा नराधम बाप पळून जाण्याच्या तयारीत असताना ओझर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पीडितेच्या फिर्यादीवरून या नराधम बापाविरुद्ध भादंवि कलम ३७६ बाललैंगिक अत्याचार कलम ५ जे १,२,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करीत आहेत.

Intro:मुलगी अंध असल्याचा फायदा घेत जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी नाशिकच्या ओझर पोलिसांनी नराधम बापास अटकही केली आहे.अल्पवयीन पीडित युवती दृष्टिहीन असून एका आश्रमशाळेत शिकत आहे आश्रम शाळेच्या नियमानुसार दर वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि याच वैद्यकीय तपासणीत ही तरुणी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल.Body:.यावेळी संबंधित शिक्षकांनी या पिडीत मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या बापानेच अत्याचार केल्याची माहिती शिक्षकांना सांगितली आणि या नंतर शिक्षकांनी याप्रकरणी नाशिकच्या ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

BYTE
भगवान मथुरे
पोलिस निरीक्षक - ओझरConclusion:संबंधित शिक्षकांनी पीडितेला मालेगाव कॅम्प पोलिस ठाण्यात घेऊन जात तिथे फिर्याद दाखल केली. परंतु, हा प्रकार ओझर पोलिस ठाण्याच्या अखत्यारित घडल्यामुळे मालेगाव कॅम्प पोलिसांनी हा गुन्हा ओझर पोलिस ठाण्याकडे वर्ग केला. आपल्या विरूध्द फिर्याद दाखल झाल्याचे समजतच हा नराधाम बाप पळून जाण्याच्या तयारीत असताना ओझर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पीडितेच्या फिर्यादीवरून या नराधाम बापाविरुद्ध भादवि कलम ३७६ बाल लैंगिक अत्याचार कलम ५जे१,२,६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस करीत आहेत.
Last Updated : Jul 26, 2019, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.