ETV Bharat / state

Nashik Drug Case : मोठी बातमी! नाशिकमधील गिरणा नदीत सापडलं 100 कोटींचं ड्रग्ज, पोलिसांकडून अंडरवॉटर शोधमोहीम

Nashik Drug Case : नाशिक ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकच्या गिरणा नदीत ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. मुंबई पोलिस आणि देवळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शोध मोहीम आखली होती. यामध्येही ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा हात असल्याचं समोर आलंय.

Drugs worth crores found in Girna river in Nashik
नाशिकमधील गिरणा नदीत सापडले करोडो रुपयांचे ड्रग्ज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 12:03 PM IST

Updated : Oct 24, 2023, 3:03 PM IST

नाशिक Nashik Drug Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात ताब्यात घेतलेला पाटील याचा वाहन चालक सचिन वाघ याची चौकशी करण्यात आली. यावेळी सचिन वाघ याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेगोडा येथील गिरणा नदी पात्रात एम डी ड्रग्ज फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, काल रात्री पासून मुंबईसह नाशिक देवळा पोलीस नदी पात्रात ड्रग्जचा शोध घेत आहेत.

ड्रग्जची किंमत अंदाजे 100 कोटी : मुंबई पोलिसांनी नाशिकच्या शिंदे गावात असलेला ललित पाटील याचा एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त करत 300 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. त्याच्या काही दिवसानंतर फरार असलेल्या ललित पाटील याला चेन्नई येथून अटक करण्यात आलं. पुढं या प्रकरणात ताब्यात घेतलेला ललित पाटील याचा वाहन चालक सचिन वाघ याच्या चौकशी दरम्यान त्याने देवळा येथील गिरणा नदीपात्रात एमडी ड्रग्ज फेकल्याचं सागितलं. यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमला रात्री दोन वाजेच्या दरम्यान नदीत ड्रग्जच्या गोण्या सापडल्या. त्यानंतर आज सकाळी देखील नदीत फेकण्यात आलेलं ड्रग्ज शोधण्याचं काम सुरू आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ यानं ड्रग्ज नष्ट करण्याच्या उद्देशानं आतापर्यंत दोन गोण्या ड्रग्ज नदीपात्रात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान या ड्रग्जची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

ललित पाटील याची नाशिकमध्ये चौकशी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत आहे. रोजच या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अटक केलेल्या भूषण पाटील यास तपासासाठी नाशिकला आणण्यात आलं होतं. त्यानंतर ड्रग्ज माफिया ललित पाटीलला देखील अटक करण्यात आली. त्याला देखील मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा चौकशीसाठी नाशिकमध्ये आणलं.

सराफ व्यावसायिकांची होणार चौकशी : दरम्यान, ललित पाटीलनं ड्रग्जच्या पैशातून आठ किलो सोनं खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं त्याने ज्या-ज्या सराफांकडून सोनं खरेदी केलं, त्या सर्व सराफ व्यावसायिकांची आता पोलीस चौकशी करणार आहेत.

हेही वाचा -

  1. Nashik Drug Case : एमडी ड्रग्जनंतर युवा पिढीला 'या' व्यसनाचा विळखा? जाणून घ्या धोके
  2. Nashik Drug Case : ड्रग्ज प्रकरणानंतर नाशिक पोलीस सतर्क; परदेशी विद्यार्थ्यांची कसून तपासणी
  3. Nashik Drug Case: नाशिक ड्रग्जचा अड्डा ; 3 किलो अमली पदार्थाचा साठा जप्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated : Oct 24, 2023, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.