नाशिक - गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या तडाखा वाढला होता. त्यामुळे जिल्हाभरात बुधवारी जोरदार पाऊस झाला. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे संचारबंदित सरकारकडून नाशिककरांना घरातच बसून राहावे लागत आहे. यातच उन्हाच्या तडाख्याने हैराण झलेल्या नाशिककरांना बुधवारी झालेल्या तुरळक पावसाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर परिसरात मेघगर्जनेसह बेमोसमी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी शेतात काढणी केलेले द्राक्ष, गहू, हरभरा, उन्हाळी कांद्याचे पीक पावसात भिजले. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. पुढील काही दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी पाऊसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र संध्याचे वातावरण कोरोना या विषाणूला पोषक देखील आहे. म्हणून नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे गरज निर्माण झाली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.