ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५३ जणांचा बळी - नाशिक कोरोना न्यूज

जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्यादेखील वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूने ५३ जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्यादेखील वाढत आहे.

naashik corona
नाशिक कोरोना
author img

By

Published : May 25, 2020, 2:56 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृतांची संख्यादेखील वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूने ५३ जणांचा बळी घेतला आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज 25 मे रोजी नाशिकच्या जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात पंचवटी भागातील 36 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकच्या पेठ रोड भागातील 36 वर्षीय रूग्ण 21 मे रोजी ताप येणे, घशात दुखणे आणि श्वसनास त्रास होत असल्याचे झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते. त्यांना पूर्वीपासून मधुमेहाचा विकार होता. रक्तातील साखरेचे प्रमाण 600 पेक्षा जास्त असल्याचे तपासात आढळून आले होते. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्ह्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या छातीच्या एक्सरेमध्ये न्यामोनियाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान 22 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजन पुरवठा सुरू होता. 24 मे रोजी त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा 25 मे रोजी सकाळी मृत्यू झाला.

नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाची परिस्थिती -

नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाबधित रुग्ण- 965
नाशिक शहरातील कोरोना बाधित रुग्ण- 97
नाशिक ग्रामीण भागातील बाधित रुग्ण - 132
मालेगाव येथील कोरोना बाधित रुग्ण - 697
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या -52
नाशिक जिल्ह्यातील कोरोनामुक्त व्यक्ती -720
नाशिक जिल्ह्यातील उपचार घेत असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -192

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.