ETV Bharat / state

Nashik Murder Case : 'लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या - श्रद्धा वालकर खून प्रकरण

किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केली आहे. नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Murder Case
प्रेयसीची हत्या
author img

By

Published : Aug 17, 2023, 7:49 PM IST

Updated : Aug 17, 2023, 7:56 PM IST

नाशिक : श्रद्धा वालकर खून प्रकरण अजूनही देशातील जनता विसरु शकलेली नाही. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात लिव्ह इन रिलेशनशिपमधून पार्टनरची हत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यामध्ये किरकोळ वादातून प्रियकाराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मृत महिलेची मुले आईपासून पोरकी झाली आहेत.

प्रियकराला केली अटक : भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसीच्या पाठीत चाकू खूपसून तिचा खून केल्याची घटना घडली आहे. पाेलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करुन संशयित प्रियकराला अटक केली आहे. प्रेयसीचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता. काैटुंबिक कारणातून तिचा पती तिला साेडून दुसरीकडे राहात आहे. याच कालावधीत तिची ओळख एका व्यक्तीसोबत झाली. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ती तिच्या मुलांसह प्रियकरासोबत राहात हाेती.

प्रेयसीच्या पाठीत खुपसली सुरी : प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात काहीना काही कारणातून खटके उडत हाेते. त्यातच मंगळवारी (दि. १५) रात्री नऊ वाजता प्रियकराने मुलाला चापट मारली. त्यातून प्रेयसी माहिलेने विचारणा केली असता दाेघांत भांडण झाले. त्याचवेळी संतापाच्या भरात प्रियकराने किचनमधील धारदार सुरी प्रेयसीच्या पाठीत खुपसली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

शवविच्छेदनात गुन्हा उघड : जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता पाठीत एक छाेटी जखमी दिसली. त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर संशयित प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा -

  1. Thane Crime: हॉटेल मालकांना चाकू धाक दाखवून लूटमार; एका गुन्हेगाराला पिस्तूलसह अटक
  2. Mumbai Crime News : कुत्र्यांना खायला घालणे पडले महागात..महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
  3. Dog Owner Knife Attack : पाळीव कुत्रांच्या वादातून कुत्र्याच्या मालकाचा शेजाऱ्यावर चाकू हल्ला

Last Updated : Aug 17, 2023, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.