ETV Bharat / state

दिवाळी स्पेशल : देशी गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली रेडिमेड आकर्षक रांगोळ्या

नाशिकच्या ऊर्जा गो संवर्धन व संशोधन केंद्रा तर्फ गोवंश सेवेबरोबर पर्यावरण पूरक शेण्याच्या वस्तूची निर्मिती केली जाते. मात्र यंदा पहिल्यांदाचं आकर्षक इको फ्रेंडली गोमय डिझायनर रांगोळ्याला साकारण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Nov 3, 2020, 7:21 AM IST

Nashik couple makes eco-friendly rangoli from cow dung
दिवाळी स्पेशल : देशी गायीच्या शेणापासून इको फ्रेंडली रेडिमेड आकर्षक रांगोळ्या

नाशिक - गो संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या नाशिकच्या शाह दाम्पत्यांनी गायीच्या शेणापासून आकर्षक रांगोळ्या साकारल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, शाह दाम्पत्याच्या इको फ्रेंडली गोमय डिझायनर रांगोळ्याला ग्राहकांची मोठी मागणी आहे.

डॉ. स्नेहल शहा अधिक माहिती देताना...

इको फ्रेंडली गोमय डिझायनर रांगोळ्या

नाशिकच्या ऊर्जा गो संवर्धन व संशोधन केंद्रा तर्फ गोवंश सेवेबरोबर पर्यावरण पूरक शेण्याच्या वस्तूची निर्मिती केली जाते. मात्र यंदा पहिल्यांदाचं आकर्षक इको फ्रेंडली गोमय डिझायनर रांगोळ्याला साकारण्यात आल्या आहेत. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असलेले सत्यजित शाह आणि भूलतज्ञ डॉ. स्नेहल शाह या दाम्पत्याने ऊर्जा गो संवर्धन व संशोधन केंद्र ही संस्था स्थापन केली. गेल्या सात वर्षापासून त्यांची ही संस्था कार्यरत असून गो संरक्षण आणि गायचे संगोपन हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. सत्यजित शाह यांच्या वडिलांनी सात वर्षापूर्वी दोन गाया पासून ही संस्था सुरू केली असून आज या गो शाळेत 30 हून अधिक गायांचा संभाळ केला जातो. तसेच शेतकऱ्यांसाठी गायांचा शेणापासून धूप, साबण, फिनेल या सोबत दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते.

शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून बघावे..
मी गेल्या सात वर्षांपासून गो पालन करत असून मला गाईचे महत्व कळलं आहे. गायीच्या शेणाचा आणि गो मूत्राचा वापर करून वस्तू बनवल्या तर गो शाळांना चांगले उत्पन्न मिळू शकते. फक्त दूध विकून शेतकऱ्यांचे भागात नाही म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शेणाचे आणि गो मूत्राचे महत्व पटवून देत त्यांना विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत असतो. शेतकऱ्यांनी देशी गायांचा संभाळ करावा हा आमचा त्यामागील उद्देश असल्याचे सत्यजित शाह यांनी सांगितले.

शहरातील नागरिकांना गायीच्या शेणाचे महत्व कळावे...
ग्रामीण भागात आजही गायीच्या शेणाने घर सारवले जाते. मात्र शहरातील नवीन पिढीला याचे फारसा महत्व माहीत नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या गो शाळेच्या माध्यमातून गायीच्या शेणापासून अनेक वस्तु बनवत असतो. ज्या फ्लॉवर पोर्ट, पेन बॉक्स, फोटो फ्रेम आणि यंदा पाहिल्यांदा दिवाळी निमित्त गायीच्या शेण्याच्या रांगोळ्या तयार केल्या आहेत. या इको फ्रेंडली रांगोळ्या नाशिकसह इतर शहरातील नागरिकांची मोठी मागणी असल्याचे डॉ. स्नेहल शहा यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.